• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • एप्रिलच्या सुरुवातीलाच पुणेकरांना करावा लागणार उकाड्याचा सामना, वाचा पुढील 5 दिवस कसं असणार हवामान

एप्रिलच्या सुरुवातीलाच पुणेकरांना करावा लागणार उकाड्याचा सामना, वाचा पुढील 5 दिवस कसं असणार हवामान

पुण्यातील कमाल तापमान (Maximum Temperature in Pune) पुढील चार दिवस 39 अंश सेल्सिअस राहाणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे, तर, ५ तारखेला कमाल तापमानात पुन्हा वाढ होणार आहे.

 • Share this:
  पुणे 01 एप्रिल : राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. 31 मार्चलाही हवामान विभागानं विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, यानंतर आता विदर्भातील नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचं चित्र (Weather Update) आहे. मात्र, पुण्यातील कमाल तापमान (Maximum Temperature in Pune) पुढील चार दिवस 39 अंश सेल्सिअस राहाणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे, तर ५ तारखेला कमाल तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. पुण्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहाणार असल्याचा अंदाजही हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. मुंबईमध्ये आज सकाळी साडेआठ वाजता 32.8 अंश सेल्सिअस तर पुण्यात 36.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे, मुंबईच्या तुलनेत पुणेकरांना उकाड्याचा अधिक सामना करावा लागत आहे. अशातच आता पाच मार्चला तापमानात आणखीच वाढ नोंदवली जाणार असल्यानं पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा नाहीच, असं म्हणायला हरकत नाही. पाच तारखेला पुण्यात 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होईल, अशी माहिती हवामान शास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या कोरड्या हवामानामुळे राज्यातील अनेक भागात तापमान वाढले आहे. दोन ते तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक भागात याचा प्रभाव दिसणार असल्याचं भारतीय हवानाम खात्याच्या संकेतस्थळावर स्पष्ट होते. मात्र, तापमान वाढीमुळे रस्त्यांवर नागरिकांची गर्दी कमी झालेली पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागातही तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ झाली असल्याचं चित्र आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: