सामूहिक सत्यनारायण.. मावळातील शेतकऱ्यांकडून पूरग्रस्तांना पशुधन दान

राज्यावरील महापूराचे संकट दूर करण्यासाठी मावळातील तळेगाव दाभाडे येथे सामूहिक सत्यनारायण करण्यात आली. या महापूजेत 1,111 दाम्पत्यांनी पूरात सर्व काही गमावलेल्या पीडितांसाठी सुख-शांती लाभावी, यासाठी परमेश्वराला साकडे घातले.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 04:53 PM IST

सामूहिक सत्यनारायण.. मावळातील शेतकऱ्यांकडून पूरग्रस्तांना पशुधन दान

अनिस शेख, (प्रतिनिधी)

मावळ, 18 ऑगस्ट- राज्यावरील महापूराचे संकट दूर करण्यासाठी मावळातील तळेगाव दाभाडे येथे सामूहिक सत्यनारायण करण्यात आली. या महापूजेत 1,111 दाम्पत्यांनी पूरात सर्व काही गमावलेल्या पीडितांसाठी सुख-शांती लाभावी, यासाठी परमेश्वराला साकडे घातले. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावर महापूरामुळे अत्यंत बिकट परिस्थिती ओढवली आहे. हजारो नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे तर शेतकऱ्यांची शेकडो जनावरे दगावली आहेत. अशा शेतकऱ्यांना मावळच्या शेतकर्‍यांनी मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्तांना पशुधनाची मदत करण्यात येणार आहे. संपूर्ण तालुक्यातून 185 गाई तसेच म्हशीचे दान करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

महाराष्ट्रावरील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवरील महापुराचे संकट दूर व्हावे तसेच संपूर्ण राज्यावर निसर्गाची कृपादृष्टी राहावी, यासाठी परमेश्वराला साकडे घालण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे सामूहिक सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. यात 1,111 दाम्पत्यांनी सहभाग घेतला.

अतिवृष्टीच्या थैमानामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यावर महापूराचे भीषण संकट ओढावले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यातच मावळ तालुक्यातील शेतकरी कुटुंबीयांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर हे संकट दूर होऊन राज्यात सुबत्ता यावी, यासाठी परमेश्वराला सत्यनारायण महापूजेचा माध्यमातून सामूहिक साकडे घालण्यात आले. या महापूजेच्या निमित्ताने पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही गावकऱ्यांनी केले आहे. ज्या पशुधनावर गरीब शेतकरी कुटुंबाची उपजीविका चालते अशा अनेक शेतकरी कुटुंबांचे संसार पुराने उद्धवस्त केला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मावळात तालुक्यातील शेतकरी आता पुढे धावून आलेला आहे. संपूर्ण तालुक्यातून 185 गाई तसेच म्हशीचे दान पूरग्रस्त पीडित शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. एका कुटुंबाला प्रातिनिधिक स्वरूपात गाय म्हशीचे दानही करण्यात येणार आहे.

VIDEO: पाणीपुरीत सापडल्या जिवंत अळ्या, पोलखोल होताच विक्रेता फरार!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...