मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

आईच्या निधनानंतरही उपचार केल्याचा दावा आणि लाटलं हजारोंचं बिल, मावळमधील धक्कादायक प्रकार

आईच्या निधनानंतरही उपचार केल्याचा दावा आणि लाटलं हजारोंचं बिल, मावळमधील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. या संकटात आरोग्य यंत्रणाही कमी पडत असताना रुग्णांच्या नातेवाईकांची लूट होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. या संकटात आरोग्य यंत्रणाही कमी पडत असताना रुग्णांच्या नातेवाईकांची लूट होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. या संकटात आरोग्य यंत्रणाही कमी पडत असताना रुग्णांच्या नातेवाईकांची लूट होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

  • Published by:  Sunil Desale

अनिस शेख, प्रतिनिधी

मावळ, 14 मे: राज्यात कोरोनाच्या लाटेचा उद्रेक (Coronavirus 2nd wave) पहायला मिळत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवत आहे. अशा या संकट काळात रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध महिलेच्या अंत्यविधीनंतरही उपचार (treatment after death) केल्याचं सांगत रुग्णालयाने भरमसाट बिल लाटल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नातेवाईकांच्या आरोपाने खळबळ

मावळ तालुक्यातील कामशेत येथे असलेल्या महावीर हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना बाधित वृद्ध महिलेच्या अंत्यविधी नंतरही तिच्यावर उपचार सुरू असल्याचा रिपोर्ट डॉक्टरांनी नातेवाईकांना दिल्याने संबंधित मयत महिलेच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार?

16 एप्रिल रोजी चार वाजण्याच्या सुमारास या कोरोना बाधित महिलेला कामशेत येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वृद्ध महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी रात्री सुविधा नसल्याने मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्या वतीने नातेवाईकां समक्ष मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाचा: Coronavirus: 21 दिवस व्हेंटिलेटरवर होता रुग्ण; बरा झाल्यानंतर डॉक्टरांच्या गळ्यात पडून अक्षरशः रडला

रुग्णालय प्रशासनाकडून मयत महिलेचे साडेपाच तासाचे बिल तब्बल 40 हजार रुपये घेण्यात आले. नातेवाईकांना या बिलामध्ये शंका वाटल्याने त्यांनी बिलाची पाहणी केली असता अंत्यसंस्कार झाल्यानंतरही दोन दिवस अधिकचे म्हणजेचे 16 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान रुग्णावर उपचार सुरू असल्याचे डिस्चार्ज रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दाखविण्यात आले.

मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडून अधिक बिल उकळले गेल्याप्रकरणी रुग्णालयाची लेखी तक्रार इन्सिडेंट कमांडर मधुसूदन बर्गे यांच्याकडे करण्यात केली आहे.

रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले

परंतु हा सर्व प्रकार कंप्यूटर कंप्यूटर सॉफ्टवेअर प्रॉब्लेम घडल्याने झाला आहे तसेच रुग्णाची कुठल्याही प्रकारची लूट झाली नसल्याचे डॉक्टर विवेक मुद्दा यांनी सांगितले आहे.

नातेवाईकांनी प्रशासनाकडे केलेल्या रुग्णालयाच्या तक्रारी नंतर आरोग्य विभाग नेमकी काय कारवाई करतं हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

First published:

Tags: Coronavirus, Pune