Home /News /pune /

पुण्यातील मटका व्यावसायिकाची खंडाळ्यात हत्या, डोक्यात गोळी झाडून पाडलं रक्ताच्या थारोळ्यात

पुण्यातील मटका व्यावसायिकाची खंडाळ्यात हत्या, डोक्यात गोळी झाडून पाडलं रक्ताच्या थारोळ्यात

Murder in Shirval: खंडाळा तालुक्याच्या शिरवळ येथील एका इमारतीच्या टेरेसवर पुण्यातील मटका व्यावसायिकाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    शिरवळ, 21 फेब्रुवारी: खंडाळा (Khandala) तालुक्याच्या शिरवळ (Shirwal) येथील एका इमारतीच्या टेरेसवर पुण्यातील (Pune) मटका (Mataka) व्यावसायिकाची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात मारेकऱ्यानं डोक्यात गोळी झाडून हत्या (Shot dead) केल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. संबंधित इमारतीत राहणारी एक महिला रविवारी सायंकाळी टेरेसवर गेली असता, हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या घटनेची माहिती शिरवळ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संजय सुभाष पाटोळे असं हत्या झालेल्या 36 वर्षीय मटका व्यावसायिकाचं नाव आहे. ते पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी फुलमळा परिसरात लेक पॅलेस नावाची इमारत आहे. ही इमारत सहा मजली आहे. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास या इमारतीत राहणारी एक महिला टेरेसवर गेली होती. यावेळी टेरेसवर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं तिला दिसलं. हेही वाचा-बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; हिजाबविरोधी पोस्टमुळे खून झाल्याचा आरोप यानंतर घाबरलेल्या महिलेनं त्वरित याची माहिती आपल्या पतीला दिली. पतीने घडलेल्या प्रकाराची माहिती शिरवळ पोलिसांना दिली. खुनाची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, पोलिसांना मृताच्या खिशात आधारकार्ड मिळालं आहे. यावरून संबंधित मृत व्यक्ती संजय पाटोळे असल्याचं निष्पन्न झालं आहे. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हेही वाचा-'एक का डबल' करण्याच्या नादात लागला दीड कोटींचा चुना, व्यावसायिकासोबत घडलं विपरीत अज्ञात मारेकऱ्यांनी मटका व्यावसायिकाच्या डोक्यात गोळी झाडून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. शिरवळ पोलीस हत्येचा उलगडा करण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद आढळतंय का? याचा तपास देखील केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Pune, Satara

    पुढील बातम्या