• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात अग्नितांडव, तब्बल 150 झोपड्या आगीत जळून खाक
  • VIDEO: पुण्यात अग्नितांडव, तब्बल 150 झोपड्या आगीत जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Nov 28, 2018 02:09 PM IST | Updated On: Nov 28, 2018 04:21 PM IST

    पुणे, 28 नोव्हेंबर : पुण्याच्या संगमवाडी पुलाजवळील पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ३० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चिंचोळ्या गल्ल्यांमुळे पोहोचणे अवघड होत आहे. या आगीची तीव्रता इतकी होती की तब्बल 150 झोपड्या यात जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही. आज पुण्यात आग लागण्याची ही दुसरी वेळ आहे. परिसरात धुराचे लोट उठल्यानं भीतीचं वातावरण आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने झोपड्यांतील लोकांना सुरक्षेत स्थळी हलवण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading