S M L

पिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास

पिंपरी चिंचवड शहरातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या मोशी कचरा डेपोला काल रात्री भीषण आग लागली.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 24, 2018 11:09 AM IST

पिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास

30 मार्च : पिंपरी चिंचवड शहरातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या मोशी कचरा डेपोला काल रात्री भीषण आग लागली. दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र ही आग कचऱ्याला लागलेली असल्या कारणाने अजुनही धुमसतीय आहे. आणि त्यामुळे सध्या परिसरात कूलिंगच काम सुरु आहे.

काल रात्री लागलेल्या या आगीत शेकडो टन कचरा जळल्यामुळे निर्माण झालेल्या धुराचा आजु बाजूच्या नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. या कचरा डेपोला आग लागण्याची ही पहिलीच घटना असल्याने, एवढी मोठी आग विझवतना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली.

तब्बल 7 तासांच्या प्रयत्नानंतर या भीषण आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं आहे. आगीच्या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालिकेचे महापौर नितिन काळजे यांनी दिले आहेत. तर आमदार महेश लांडगे आणि इतर अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तात्काळ मदत करत, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी अग्निशमन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2018 08:52 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close