Home /News /pune /

VIDEO: पिंपरीत गॅसच्या पाईप लाईनला भीषण आग; पाच वाहने जळून खाक

VIDEO: पिंपरीत गॅसच्या पाईप लाईनला भीषण आग; पाच वाहने जळून खाक

Pimpri Fire: पिंपरी चिंचवडमधील पिंपळेगुरव परिसरात गॅसच्या पाईप लाईनला आग लागली.

पिंपरी चिंचवड, 11 मे: पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) पिंपळेगुरव (Pimplegurav) परिसरात गॅस पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला भीषण आग (Massive fire at MNGL) लागली. ही आग इतकी भीषण आहे की त्या परिसरात पार्क करण्यात आलेल्या वाहनांनीही पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या ज्वाळा अशा 20 फूट उंच जात होत्या तर धुरांचं लोटही सर्वत्र पसलरे होते.  प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार पिंपळेगुरव परिसरातील काटेपूरम चोका जवळील राम नगरच्या रस्त्या लगट MNGLच्या पाईप लाईन च्या दुरुस्ती च काम सुरू होतं त्यावेळी गॅस गळती झाली आणि आचनाक आग लागली. सुरवातीला आग सौम्य होती मात्र काही सेकंदात आगीने रौद्ररूप धारण केल आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेची चार चाकी वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळेगुरव परिसरात असलेल्या मयूर नगर (Mayur Nagar) रस्त्यावर महाराष्ट्र नॅचरल  गॅस लिमिटेडच्या पाईपलाईनला (Maharashtra Natural Gas Limited pipeline) दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे शेजारी उभ्या असलेल्या वाहनांनी सुद्धा पेट घेतला. बघता-बघता एक दोन नाही तर तब्बल 5 वाहनांनी पेट घेतला. या आगीत पाचही कार जळून खाक झाल्या आहेत. वाचा: महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत नातेवाईकांना पाठवले अश्लील फोटो, सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदल दाखल झाल आणि त्यांनी सुमारे 1 तासांच्या प्रयत्न नंतर ही आगिवर पूर्णतः नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Fire, Pimpri chinchavad

पुढील बातम्या