BREAKING : पिंपरी चिंचवडमध्ये खासगी कंपनीत भीषण स्फोट, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

BREAKING : पिंपरी चिंचवडमध्ये खासगी कंपनीत भीषण स्फोट, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad ) थेरगाव परिसरातील आज दुपारी ही घटना घडली आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 24 एप्रिल : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad ) थेरगावात एका खासगी कंपनीत (blast) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाने आजूबाजूचा परिसर हादरून गेला असून अनेक दुकानाचं नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे.

पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरातील आज दुपारी ही घटना घडली आहे.  एका खासगी कंपनीत अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे आजूबाजूच्या घरांना तडे गेले आहे. अनेक दुकानांचं नुकसान झालं आहे. या स्फोटात कंपनी उद्ध्वस्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे.बचावकार्य सुरू आहे.

(सविस्तर बातमी लवकरच )

Published by: sachin Salve
First published: April 24, 2021, 4:38 PM IST

ताज्या बातम्या