Home /News /pune /

भरधाव स्विफ्ट कार ट्रकच्या खाली घुसली, एकाचा जागीच मृत्यू

भरधाव स्विफ्ट कार ट्रकच्या खाली घुसली, एकाचा जागीच मृत्यू

दौंड तालुक्यातील खडकी काळभोरवस्तीजवळ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला.

    सुमित सोनवणे, प्रतिनिधी दौंड, 06 ऑक्टोबर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी गावाजवळ मारुती स्विफ्ट आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका जणाचा जागीच मृ्त्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहे. दौंड तालुक्यातील खडकी काळभोरवस्तीजवळ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज मंगळवारी  सकाळी हा अपघात झाला. सोलापूर येथून स्विफ्ट गाडी (एमएच.14, बीआर. 5227) पुण्याकडे जात होती. खडकी गावाजवळ पोहोचल्यावर भरधाव वेगात असलेली स्विफ्ट गाडी अचानक एका ट्रकवर आदळली. हाथरस घटनेच्या निषेधासाठी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कार  ट्रक (एमएच. 25, पी. 1247) च्या पाठीमागून खाली गेली. या अपघातात स्विफ्टच्या वरच्या बाजूचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.  त्यामुळे स्विफ्टमध्ये पुढे बसलेला एक जण जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेले दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना भिगवणमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात मृत झालेल्या व्यक्तीची मृतदेह हा शवविच्छेदनासाठी दौंडमधील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. पुण्यात नवले पुलावर विचित्र अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू दरम्यान, पुणे शहरातील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी विचित्र अपघात झाला. एका भरधाव ट्रकने 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण  जखमी झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्या 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा PHOTO मागचं रहस्य मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक कात्रजकडून देहूरोडच्या दिशेने चाललेला होता. भरधाव ट्रकचे अचानक टायर फुटले होते, त्यामुळे ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला. या भरधाव ट्रकने दुचाकी आणि तीन ते चार, चार चाकी गाड्यांना धडक दिली. या अपघातात एका जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आणखी चार जणांना नवले रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: दौंड

    पुढील बातम्या