Home /News /pune /

भलत्याच कारणावरून पती द्यायचा त्रास, पुण्यात 21 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन

भलत्याच कारणावरून पती द्यायचा त्रास, पुण्यात 21 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन

Crime in Pune: पुणे शहरातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमानुषतेचा कळस गाठणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून येथील एका 21 वर्षीय महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

    पुणे, 18 फेब्रुवारी: पुणे (Pune) शहरातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमानुषतेचा कळस गाठणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून येथील एका 21 वर्षीय महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या (Married woman commit suicide) केली आहे. या प्रकरणी पतीसह सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पतीला अटक (Husband arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत. कविता अतुल साळवे असं आत्महत्या करणाऱ्या 21 वर्षीय विवाहित महिलेचं  नाव आहे. तर अतुल गोरख साळवे (वय-31) सासू सुनीता साळवे आणि दीर आकाश साळवे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी पर्वती परिसरातील जनता वसाहत येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती अतुल साळवे याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. हेही वाचा-पत्नीसह सासरच्यांकडून सुरू होता अमानुष छळ; प्राध्यापकानं केला हृदयद्रावक शेवट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कविता हीचा काही दिवसांपूर्वी आरोपी अतुल याच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवस सुखात गेल्यानंतर पतीने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. 'तुझ्याशी लग्न झाल्यामुळे माझं वाटोळं झालं आहे. तुला घरकाम येत नाही. तुझे आई वडील जादूटोणा करतात, त्यामुळे मला यश येत नाही.'अशा विविध कारणातून आरोपी पीडितेशी वाद घालून तिला मारहाण करत होता. हेही वाचा- बदला घेण्यासाठी पार केली हद्द; HIV पॉझिटिव्ह पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य आरोपी पती मागील बऱ्याच दिवसांपासून पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 2 फेब्रुवारी रोजी पीडित तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पीडितेची वडील प्रकाश त्रिंबक तायडे (60) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Suicide

    पुढील बातम्या