विवाहित तरुणीने पुन्हा केले लग्न,तिच्या त्रासाला कंटाळून तरुणाने स्वत:ला संपवले!

लग्न केल्यानंतर दोघांनीही ही माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली नाही. दोघेही वेगवेगळे राहत होते.

लग्न केल्यानंतर दोघांनीही ही माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली नाही. दोघेही वेगवेगळे राहत होते.

  • Share this:
      पुणे, 18 सप्टेंबर : एका तरुणीने आधीच लग्न केलेले असताना दुसऱ्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दुसऱ्यांदा लग्न केले. पण लग्न झाल्यानंतर तरुणाला पैसे आणि पळून जाण्याची धमकी देऊन मानसिक छळ केला. अखेर या तरुणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. महाराष्ट्र टाईम्स दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. ही घटना 28 जूनला उंड्रीमध्ये घडली होती. पण पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.  या तरुणीचे आधीच लग्न झालेले होते. पण, तरीही मृत तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी दोघांनी रजिस्टर लग्न केले होते. लग्न केल्यानंतर दोघांनीही ही माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली नाही. दोघेही वेगवेगळे राहत होते. सावधान! देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या काय घ्याल खबरदारी आपआपल्या घरी राहत दोघेही बाहेर भेटत होते. याच काळात दोघांमध्ये शारिरिक संबंध प्रस्थापित झाले. या तरुणीने आपले आधीच लग्न झाले आहे अशी माहिती या तरुणाला दिलीच नव्हती. काही दिवसांनी या तरुणीने पळून जाण्यासाठी या तरुणावर दबाव टाकला. एवढंच नाहीतर या तरुणाकडून तिने वारंवार पैसेही उकळले होते. या तरुणीच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाली. त्यामुळे तिचे नातेवाईकही या तरुणाला  त्रास देत होते. पण, या तरुणाच्या कुटुंबीयांना याची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी या तरुणाचे लग्न ठरवले होते. ही माहिती तरुणीला समजल्यामुळे तिने तरुणाला पळून जाण्यासाठी दबाव टाकला. अन्यथा तुझ्या कुटुंबाला याची माहिती देईल अशी धमकी दिली होती. त्यामुळे या त्रासाला कंटाळून साखरपुड्याच्या आदल्या दिवशीच या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आदित्य ठाकरे म्हणाले होते, 'केम छो', आता वरळीकर म्हणाले म्हणाले, 'मनसेत चाललो'! या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली होती. पण, त्याच्या मित्रांकडे पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. तसंच मृत तरुणाच्या फोन कॉलची माहिती गोळा केली असता, आधी माहिती मिळाली. अखेर या प्रकरणी  कोंढवा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून तरुणाच्या कथित पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published: