Home /News /pune /

लॉकडाऊनमध्ये पुण्यात फाईव्हस्टार हॉटेलात झालं लग्न, कोरोनाने दोघांचा मृत्यू तर 25 जण पॉझिटिव्ह

लॉकडाऊनमध्ये पुण्यात फाईव्हस्टार हॉटेलात झालं लग्न, कोरोनाने दोघांचा मृत्यू तर 25 जण पॉझिटिव्ह

महाराष्ट्रातील Active रुग्णांच्या संख्येत 7 टक्क्यांची घट झाली अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.

महाराष्ट्रातील Active रुग्णांच्या संख्येत 7 टक्क्यांची घट झाली अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.

नगर रोडवरच्या ‘हयात रिजन्सी’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी हॉटेलला नोटीस दिली आहे.

पुणे 11 ऑगस्ट: कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी टाळा असं आवाहन सरकार वारवार करत आहे. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनाला दूर ठेवण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे सरकारनेही सगळ्या कार्यक्रमांवर बंधणेही घातले आहेत. मात्र सतत सूचना देऊनही अनेक जण या नियमांचं उल्लंघन करत असल्याच्या घटना घडत आहेत. लॉकडाऊन असतांनाही फाईव्हस्टार हॉटेलात लग्नाला गेलेल्या दोघांचा मृत्यू झालाय तर 25 जणांना कोरोना झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंचतारांकित हॉटेलला नोटीस दिली असून आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. नगर रोडवरच्या ‘हयात रिजन्सी’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी हॉटेलला नोटीस दिली आहे. तब्बल 250 लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल अकरा हजार 88 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 256 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्युदर 3.42 टक्के इतका आहे. राज्यात आज 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजपर्यंत तीन लाख 68 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 68.79 टक्के एवढं झालं आहे. राज्यात सध्या दहा लाख 4233 व्यक्ती घरात विलीगिकरणात आहेत तर 35 हजार 648 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यामध्ये आहेत. एक लाख 48 हजार 553 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 173 कोरोणा पॉझीटिव्ह  रुग्णांची नोंद झाली.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या