'तुमच्या Ex सोबतही पाहू शकता' : मराठी अभिनेते पोस्टर घेऊन रस्त्यावर; काय आहे गुपित?

'तुमच्या Ex सोबतही पाहू शकता' : मराठी अभिनेते पोस्टर घेऊन रस्त्यावर; काय आहे गुपित?

'तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता' असं पोस्टर घेऊन मराठी अभिनेते पुण्याच्या रस्त्यावर का उतरले?

  • Share this:

पुणे, 2 मार्च : पुण्यातल्या काही शो कार्ड्सची सध्या मोठी चर्चा राज्यात आहे. लोकप्रिय मराठी कलाकारांच्या हातातल्या फलकांनी काही पुणेकरांच्या भुवया उंचावल्या तर कॉलेजच्या तरुणाई मात्र काही खास प्लॅन तयार करत आहेत. असे हे काय फलक आहेत ज्याची मोठी चर्चा सुरु आहे. पण हा प्रयत्न आहे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनचा. मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवणाऱ्या प्रेक्षकांची पावलं पुन्हा मराठी चित्रपटाकडे वळवण्यासाठी या कलाकारांनी हा खटाटोप केला.

मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.या चित्रपटातल्या अभिनेत्री व दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेऊन मुंबई आणि पुण्यात रसिकांना साकडं घातलं. या कलाकारांनी रस्त्यात उभं राहून जाहीरात करण्यापेक्षा लोकांमध्ये चर्चा आहे ती या कलाकारांच्या हातातल्या फलकांची. ‘मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’, असे फलक घेऊन हे कलाकार हमरस्त्यात उभे होते. लोकही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते आणि चित्रपटासाठी येण्याचे आश्वासनही या कलाकारांना देत होते.

तुमच्या 'एक्स' सोबत...

मुंबईत अंधेरी, विलेपार्ले यासह पुण्यात झालेल्या या खास कॅम्पेनमध्ये लोकप्रिय कलाकार सुव्रत जोशीच्या हातातला फलक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. तो फलक सुद्धा खास होता. कारण त्यावर लिहिलं होतं, 'आमचा सिनेमा तुम्ही आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी ते अगदी तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता'. यामुळेच या चित्रपटात काही खास आहे असा अनेकांचा अंदाज आहे. यामुळेच कॉलेजच्या तरुणाईत मोठे प्लॅन केले जात आहेत. माध्यमांच्या भडीमारामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय कमी होते की काय, अशी भिती वाटत आहे. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक चित्रपटगृहाकडे यावा आणि आमच्या वेगळ्या प्रयत्नाला त्याने पाठबळ द्यावे, म्हणून आम्ही हा ‘हटके’ मार्ग अवलंबला,” असं अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सांगितलं.

काय आहे वास्तव?

वेगळ्या कल्पनेतलं कॅम्पेन वगैरे असेलही. पण यामगचं खरं कारण वेगळंच आहे. येत्या 6 मार्च 2 मराठी आणि 1 हिंदी बिग बजेट चित्रपट रिलीझ होणार आहेत. शिवाय गेल्या काही महिन्यात मराठी चित्रपटाकडे रसिकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत थोडीशी चिंता आहे. यामुळे प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी मन फकिरा या चित्रपटाच्या टीम ने प्रसिद्धीचा हा अनोका फंडा राबवला आहे.

अन्य बातम्या

मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या घोषणेवर राहुल गांधी यांचा टोला... काय Tweet केलं पाहा

ब्रेकअपनंतर नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंड अनोखा अंदाज, VIDEO VIRAL

शूटिंग सुरू असताना सलमान माझ्याशी फ्लर्ट करायचा, अभिनेत्री भाग्यश्रीचा खुलासा

First published: March 2, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या