बाजाच्या सुरावटींची गुंफण करणारा संगीतकार हरपला, नरेंद्र भिडे यांचं निधन

बाजाच्या सुरावटींची गुंफण करणारा संगीतकार हरपला, नरेंद्र भिडे यांचं निधन

आपल्या संगीतातून शास्त्रीय व आधुनिक बाजाच्या सुरावटींची गुंफण करत आंतरारष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले मराठी संगीतकार नरेंद्र भिडे

  • Share this:

पुणे, 10 डिसेंबर: आपल्या संगीतातून शास्त्रीय व आधुनिक बाजाच्या सुरावटींची गुंफण करत आंतरारष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले मराठी  संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज 10 डिसेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव सकाळी 9 वाजून 30 मिनिटाला कर्वे नगर येथील डॉन स्टुडिओ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर 11 वाजता वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नरेंद्र भिडे यांच्या पाश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुले आहेत.

इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले नरेंद्र भिडे यांनी अनेक चित्रपटांना संगीतबद्ध केलं होतं. आगामी 'सरसेनापती हंबीरराव' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

हेही वाचा...एकेकाळी जेठालालला केवळ 50 रुपये मिळायचे, मुलाखतीत सांगितली संघर्षाची कथा

अवांतिका, ऊन पाऊस, साळसुद, घरकुल, मानो या ना मानो, पळसाला पाने पाच, भूमिका, पेशवाई, नूपुर, अबोली, श्रावण सरी, सुर – ताल, कॉमेडी डॉट कॉम, फुकट घेतला शाम, अमर प्रेम  या मालिकांना तर देऊळबंद, मुळशी पॅटर्न, पुष्पक विमान, चि सौ कां, अनुमती, पाऊलवाट कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी, मालक, मसाला, समुद्र, चाँद फिर निकला (हिन्दी) याशिवाय श्वास, सरीवर सरी, माती माय आणि रानभूल या चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलं.

कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस , व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि ४० चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस, संगीत गर्वनिर्वाण आदी नाटकांना संगीत दिलं.

मनाप्रमाणे काम केल्यास ते लोकांपर्यंत पोहोचते, असं नरेंद्र भिडे कायम म्हणत असत. तुम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे काम कराल, तेवढं ते अधिक लोकांपर्यत पोहोचेल. तर लोकांच्या कलानं घ्याल, तेवढं त्यांच्यापासून दूर जाताल, असंही संगीतकार नरेंद्र भिडे यांनी सांगितलं होतं.

विठ्ठला... उर्दू गाणं..

आषाढी वारी दरम्यान गायक महेश गाळे, कवी-गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांनी 'विठ्ठला...' एक युनिक गाणे विठ्ठलाच्या चरणी वाहिलं होतं. विशेष म्हणजे विठ्ठला... या गीताचे बोल उर्दू भाषेत आहेत.

अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतले असले तरी माझ्या आजोळची कलाक्षेत्राची पार्श्वभूमी असल्यामुळे संगीतक्षेत्रात त्यांचा प्रवास सुरू झाला होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मनात गाणं सुरू असतं, असं ते नेहमी सांगत. शास्त्रीय संगीत शिकल्यानं गाण्याचा प्रकार कोणताही असो, पण त्याकडे पाहण्याची दृष्टी, विचार देखील शास्त्रीय असायला हवेत, असं नरेंद्र भिडे सांगत.

नरेंद्र भिडे यांनी एखाद्या गाण्याला संगीतबद्ध करताना, त्याची चाल तयार करण्याचा कधी बाऊ केला नाही. एखाद्या गाण्याला विशिष्ट ठिकाणीच गेलं की चाल सुचते, असं नाही. डेडलाइन जवळ आली की नरेंद्र भिडे आपले सगळे अनुभव पणाला लावून काम करत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 10, 2020, 7:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading