पुणे, 29 नोव्हेंबर : मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय निर्णायक बैठक पुणे येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थी व नोकरी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना डावलून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या प्रकरणी मराठा समाज अस्वस्थ असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसंच नव्या आंदोलनाचीही घोषणा करण्यात आली.
महावितरणमध्ये उमेदवारांना डावलून नियुक्त्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतल्याने मराठा समाज येत्या 1 व 2 डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्यानुसार अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 8 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्रभरातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लाँग मार्च काढणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयकांनी बैठक संपल्यानंतर दिली.
2014 ते 2020 प्रलंबित शासकीय नियुक्ती उमेदवार प्रश्न, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुपर न्युमररी, अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यान्वित करणे असे अनेक प्रश्न शासनाने सोडवले नसल्याचा आरोप करत मराठा तरुण आक्रमक झाले आहेत.
या बैठकीत दिल्ली येथून छत्रपती संभाजीराजे , ॲड दिलीप तौर , औरंगाबाद एम एम तांबे , अहमदनगर बाळासाहेब सराटे यांनी संवाद साधला.
या बैठकीला मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे, राजेंद्र कुंजीर, विरेंद्र पवार - मुंबई , संजीव भोर अहमदनगर , अंकुश कदम- नविमुंबई , विनोद साबळे - रायगड , राजन घाग - मुंबई , तुषार जगताप , गणेश कदम - नाशिक ,दिलीप पाटील-कोल्हापुर , माऊली पवार- रवि मोहीते - सोलापुर , गंगाधर काळकुटे -बिड , रवि सोडतकर- औरंगाबाद , डॉ सजय पाटील- सांगली , रूपेश मांजरेकर - मुंबई , किशोर मोरे, दशहरी चव्हाण तसेच अनेक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.