पुण्यात बेमुदत ठिय्या आंदोलन, मराठा समाजातील संघटनांची आक्रमक भूमिका

पुण्यात बेमुदत ठिय्या आंदोलन, मराठा समाजातील संघटनांची आक्रमक भूमिका

मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी सारथी कार्यालयासमोर दिनांक 07 डिसेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, 6 डिसेंबर : विविध समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापत असतानाच आता विविध मागण्यांसाठी मराठा समाजातील संघटना पुण्यात ठिय्या आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी सारथी कार्यालयासमोर दिनांक 07 डिसेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

काय आहेत मागण्या?

सारथीच्या वतीने तारादूत प्रकल्प सुरू झाला पाहिजे या मागणीसाठी आता मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असं आंदोलनाचा इशारा देणाऱ्या संघटनांचं म्हणणं आहे.

1) मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी

2) मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे, त्या योजनेचे अर्ज भरून प्रत्यक्ष मराठा घटकातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचं काम तारादूत करू शकतात

3) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता ही योजना चालू आहे. त्या योजनेच्या अंतर्गत कॉलेजमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरुण घेणे उपस्थिती तसेच योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम तारादूत करू शकतात. (जसे की बार्टीचे समतादूत स्वाधार योजनेची करतात)

4) कुठल्याही समाजासाठी शासनाला योजना चालू करायची असेल तर शासनाकडे त्या समाजाबद्दल पुरेशी माहिती असणे आवश्यक असते त्याच प्रमाणे मराठा समाजाची माहिती संकलित करण्यासाठी तारादूत प्रकल्प आहे.

5) सारथी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आणि तारादूतांची कौशल्य विकास योजनेसाठी कार्यशाळा झालेली आहे त्यामुळे कौशल्य विकास कार्यक्रम प्रत्यक्ष मराठा-कुणबी घटकांपर्यंत कसा पोहोचायचा याबाबत तारादूतांना प्रशिक्षण देण्यात आले आहे

6) शासनाच्या तसेच सारथीच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्यक्ष मराठा-कुणबी घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष मराठा-कुणबी घटकांना देण्यासाठी तारादूत प्रकल्प आहे

7) मराठा समाजाची आर्थिक स्थिती ही नाजूक आहे त्यासाठी चांगल्या शाळेमध्ये आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष मराठा कुणबी घटकातील विद्यार्थ्यांचं इंग्रजी माध्यम आतलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तारादूत प्रकल्प मदत करेल.

8) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या आर्थिक लाभाची व्याप्ती ग्रामीण भागातील नवनवीन उद्योजकांना प्रत्यक्ष या महामंडळा अंतर्गत लोन उपलब्ध करून देण्यासाठी तारादूत प्रकल्पा मार्फत मदत.

9) मराठा समाजाचे शैक्षणिक प्रमाण कमी आहे अशा वेळी शिक्षणच्या बाबतीत जागृती करुण समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तारादूत प्रकल्प आहे.

10) जिल्हा उद्योग केंद्राअतर्गत नवीन नवीन प्रशिक्षण देऊन मराठा समाजातील तरुनांना ऊद्योगात आणण्यासाठी तारादूत प्रकल्प मार्फत जनजागृती.

11) मराठा कुणबी घटकातील महिलांना आर्थिक सामाजिक तसेच शैक्षणिक सक्षम करण्यासाठी तारादूत प्रकल्प आहे.

12 ) आय बी पी एस, क्लर्क, रेल्वे भरती, स्पर्धा परीक्षा याबाबत मराठा कुणबी घटकातील तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी तारादूत प्रकल्प आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 6, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या