चाकणच्या हिंसेत पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण, प्रकृती धोक्याबाहेर

चाकणच्या हिंसेत पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण, प्रकृती धोक्याबाहेर

काल चाकणमध्ये उसळलेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर हल्ले केले.

  • Share this:

पूणे, 31 जुलै : काल चाकणमध्ये उसळलेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी पोलिसांवर हल्ले केले. यामध्ये पोलीस कर्मचारी अजय भापकर जबर जखमी झाले आहेत. त्याचे फोटो इतके भयानक आणि विचलित करणारे आहेत की आम्ही तुम्हाला ते दाखवूही शकत नाही. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील जहांगीर रुग्णालयात त्यांची विचारपूस करायला जाणार आहेत.

यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजिस्विनी सावंत, पोलीस उप अधीक्षक गणपत माडगुळकर, चाकणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे ,राम पठारे यांच्या सह अन्य दोन कर्मचारी जखमी झाले होते, या सर्वांवर उपचार करण्यात आले असुन सर्वांची प्रकृति स्थिर असल्याच समजतय.

मराठा आंदोलना दरम्यान काल झालेल्या हिंसाचारा नंतर आज चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता बघायला मिळतीय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजही चाकणमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला गेलाय.

चाकणमध्ये कालपासून चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काल केलेल्या जाळपोळीत सरकारचं सुमारे ८ कोटींचं नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात ३ हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजही चाकणमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. दरम्यान कालच्या जाळपोळ आणि तोडफोडीमध्ये किती नुकसान झाल याचा आज पंचनामा केला जाईल. तसेच चाकण शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि  बसस्थानकां येथील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केल्यानंतर,  संशयित दंगलखोरांना ताब्यात घेण्यासाठी पथकं नेमली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुण्यात शिवाजीनगर बस स्थानकावरून नाशिककडे जाणाऱ्या बसेस काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. चाकणला झालेल्या घटनेनंतर पुढचा आढावा घेऊन बस सोडण्यात येत आहेत. या सर्व प्रकरणात प्रवाशांचे मात्र यामुळे हाल होत असून अनेकांना इच्छित स्थळी जाता येत नाहीये. दादर, बोरिवली आणि औरंगाबाद बसेस सोडण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक आंदोलन करण्यात येत आहे. काल चाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. तब्बल १०० ते १५० गाड्या आंदोलकांनी फोडल्या. चाकणजवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलंय. संध्याकाळी चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीये.

First published: July 31, 2018, 2:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading