चाकण हिंसेप्रकरणी एका रात्रीत 20 जण घेतले ताब्यात

चाकणमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस पाहायला चाकणमध्ये मिळाला.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2018 08:59 AM IST

चाकण हिंसेप्रकरणी एका रात्रीत 20 जण घेतले ताब्यात

चाकण, 02 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला. त्यात ठिकठिकाणी आंदोलनाला हिसंक वळण लागलेलं पहायला मिळालं. या पुण्याच्या चाकणमध्येही मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. या हिंसाचाराप्रकरणी आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. यात 20 जणांना अटक करण्यात आलं आहे. रात्री उशिरापासून या अटक सत्राला सुरूवात झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज्या आधारे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या समाज कंटकांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. एसपी संदीप पाटील यांनी दिली आहे.

चाकणमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस पाहायला चाकणमध्ये मिळाला. चाकणमध्ये चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या जाळपोळीत सरकारचं सुमारे ८ कोटींचं नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात ३ हजार आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यावर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

आरक्षणातलं उद्धव ठाकरेंना काय कळतं, नारायण राणेंचं शिवसेनेवर तोंडसुख

चाकणमध्ये आंदोलकांनी तब्बल १०० ते १५० गाड्या आंदोलकांनी फोडल्या. चाकणजवळच्या तळेगाव चौकात आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलंय. संध्याकाळी चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती.

चाकणमध्ये उसळलेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ले केले होते. यामध्ये पोलीस कर्मचारी अजय भापकर जबर जखमी झालेत. यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजिस्विनी सावंत, पोलीस उप अधीक्षक गणपत माडगुळकर, चाकणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे ,राम पठारे यांच्या सह अन्य दोन कर्मचारी जखमी झाले होते, या सर्वांवर उपचार करण्यात आले असुन सर्वांची प्रकृति स्थिर आहे.

Loading...

हेही वाचा...

एकीकडे मराठा मोर्चा समन्वयकांची तर दुसरीकडे भाजप आमदारांची आरक्षणावर बैठक

VIDEO : फिट राहण्यासाठी घरबसल्या करा हे झटपट व्यायाम

VIDEO : नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीची लोकांना शिवीगाळ,व्हिडिओ व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 08:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...