News18 Lokmat

असा अाहे पुण्यातील गणपती विसर्जनाचा मार्ग

विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातल्या वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक बंद करण्यात आलीये.शहरात येण्यासाठी वर्तुळाकार मार्ग ठेवण्यात आलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2017 03:34 PM IST

असा अाहे पुण्यातील गणपती विसर्जनाचा मार्ग

04 सप्टेंबर : विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातल्या वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक बंद करण्यात आलीये.शहरात येण्यासाठी वर्तुळाकार मार्ग ठेवण्यात आलाय.

जंगली महाराज रस्त्यावर स. गो. बर्वे चौक ते झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक या दरम्यान वाहतूक सुरू राहणार आहे.

शिवाजी रस्त्यावर सिमला ऑफिस चौक ते काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक या दरम्यान, मुदलीयार रस्त्यावर अपोलो टॉकिजपर्यंत, नेहरू रस्ता संत कबीर पोलिस चौकीपर्यंत सुरू राहणार आहे.

कर्वे रस्त्यावर नळ स्टॉपपर्यंत वाहतूक सुरू राहणार आहे. दरम्यान, रस्ते बंदसाठी ठिकठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले आहेत.

Loading...

यामध्ये अनेक ठिकाणचे बॅरिकेड आवश्यकतेप्रमाणे हटविणे शक्य होणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत वाहनांना रस्ता मोकळा करून देणे शक्य होणार आहे.

वर्तुळाकार मार्ग

कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक-लॉ कॉलेज रस्ता-सेनापती बापट रस्ता-चतुःश्रृंगी-गणेशखिंड रस्ता-सिमला ऑफिस चौक-संचेती हॉस्पिटल चौक-इंजिनीअरिंग कॉलेज-आंबेडकर रस्ता-शाहीर अमर शेख चौक-मालधक्का चौक-बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरू रस्त्यावरून संत कबीर पोलिस चौकी-सेव्हन लव्हज चौक-वखार महामंडळ चौक-शिवनेरी रस्त्याने गुलटेकडी मार्केट यार्ड-सातारा रस्ता-व्होल्गा चौक-सिंहगड रस्त्याने मित्र मंडळ चौक-सावरकर चौक-लाल बहादूर शास्त्री रस्ता-सेनादत्त पेठ चौकी-अनंत कान्हेरे रस्ता-म्हात्रे पूल ते नळ स्टॉप.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 03:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...