मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

11 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता

11 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता

राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India
  • Published by:  Sandeep Shirguppe

पुणे, 10 डिसेंबर : बंगालच्या उपसागरात वादळ झाल्याने देशातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमध्ये शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रातही याचा परिणाम होणार आहे. राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूत होणार असल्याचे सांगण्यात आले असून या भागात रेड अलर्टही देण्यात आला आहे. या वादळाचा दक्षिणेकडे मोठा परिणाम होत असतानाच या चक्रीवादळाचा राज्यावरही मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

राज्यातील मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यात 11 ते 13  डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा : शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात, 'गवसे धरण' फुटलं, कोल्हापुरातला धडकी भरवणारा LIVE VIDEO

10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ

हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होत आहे. आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्‍यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती

बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ सध्या आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता नाही. याबाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळाचा विशेष परिणाम हा महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा : जायकवाडीला दरवर्षी येणारे विदेशी पाहुणे कुठे हरवले? पाहा Video

चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीवर परिणाम होणार आहे. राज्यात सध्या असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे. थंडीला कदाचित आठवडाभरच अटकाव होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Cyclone, Mumbai rain, Rain in kolhapur, Weather, Weather forecast