Home /News /pune /

शिवाजीराव भोसले बॅंक घोटाळा प्रकरणी 3 शाखांच्या व्यवस्थापकांना अटक

शिवाजीराव भोसले बॅंक घोटाळा प्रकरणी 3 शाखांच्या व्यवस्थापकांना अटक

यापूर्वी ही बांदल यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात इतर काही गुन्हे दाखल आहेत.

पुणे, 04 जुलै: पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती तथा पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील बडे नेते असलेल्या मंगलदास बांदल  (Mangaldas Badal) यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या (Shivajirao Bhosale Co operative Banks) तीन शाखांच्या व्यवस्थापकांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. तर मंगलदास बांदल यांना ही या पूर्वीच शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. वडगाव शेरी शाखेचे गोरख दोरगे, तर औंध शाखेचे प्रदीप निम्हण आणि कोथरुड शाखेचे नितीन बाठे या तीनही व्यवस्थापकांनी बांदला यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याचे पोलीस तपासात दिसून आल्याने त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना ही रिझर्व्ह बँकेने 400 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात रद्द केला आहे.

बापानंच उद्धवस्त केला मुलीचा संसार; गोळीबारात चौघांचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी

मंगलदास बांदल यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून बँक गैरव्यवहार फसवणूक प्रकरणात शिक्रापूर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहे. यापूर्वी ही बांदल यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात इतर काही गुन्हे दाखल आहेत. काय आहे प्रकरणं भारतीय रिझर्व्ह बँकने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे 2018-19 वर्षाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता, त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी असल्याचे आढळले. त्यानुसार, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आमदार अनिल भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते अशा एकूण 11 पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी आमदार अनिल भोसलेंना अटकही झाली. रत्नागिरी जिल्हापरिषदेत इंजिनिअर्ससाठी पदभरती; डिप्लोमा धारकही करू शकतात अर्ज एवढंच नाही तर त्यांच्या 3 आलिशान गाड्याही जप्त केल्या गेल्यात. भोसले यांच्यासह 11 जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. बँकेच्या एकूण 14 शाखा असून, 95 हजार खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत 12 कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे. न्यूज18 लोकमतनेच हा सर्व घोटाळा उघडकीस आणला होता.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Police, Police arrest, Pune

पुढील बातम्या