मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील धक्कादायक प्रकार; मसाज करतानाचा VIDEO VIRAL करण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी

पुण्यातील धक्कादायक प्रकार; मसाज करतानाचा VIDEO VIRAL करण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी

मॉलिशने मानसिक तणाव दूर होण्यात मदत होईल, शरीराचा थकवा जाईल आणि मूडही चांगला होऊन झोपही चांगली लागेल.

मॉलिशने मानसिक तणाव दूर होण्यात मदत होईल, शरीराचा थकवा जाईल आणि मूडही चांगला होऊन झोपही चांगली लागेल.

Pune Crime: संबंधित आरोपीने पीडित महिलेला मसाज (Massage) करतानाचा व्हिडिओ (Video) व्हायरल करतो, अशी धमकी देत शरीरसुखाची (demand sexual intercource) मागणी केली आहे.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 16 जानेवारी: पुण्यातील (Pune) मार्केडयार्ड परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाजचं काम करणाऱ्या एका महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आरोपी पीडित महिलेला मसाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी देत शरीरसुखाची मागणी करत होता. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलं असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. सदर घटनेतील आरोपीचं नाव सुरेश किसन माने असून तो पुण्यातील धनकवडी येथील रहिवाशी आहे. तीन दिवसांपूर्वी आरोपी संबंधित आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता. तिथे मसाज करत असताना त्याने मसाज करतानाचा व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने फिर्यादी महिलेला शरीरसुखाची मागणी करत होता. याला नकार दिल्यानंतर आरोपीने महिलेला शिवीगाळही केली, असं पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. हे ही वाचा-बापरे! वृद्ध सासूबरोबर सुनेनं केलं हे क्रूर कृत्य, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल संबंधित घटना 13 ते 15 जानेवारी दरम्यान घडली आहे. पीडित महिला एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्याचे काम करते. आरोपी सुरेश माने हा ग्राहक म्हणून या केंद्रात आला होता. त्याने तिथे मसाज करुन घेतला. मसाज करताना त्याने फिर्यादीचा व्हिडीओ रेकॉर्डिंग केला. हा व्हिडीओ व्हायरल करतो, अन्यथा माझ्याशी शरीर संबंध ठेव अशी धमकी या तरुणाने पीडितेला दिली. त्याने संबंधित व्हिडीओ पीडित महिलेच्या मोबाईलवर पाठवून शिवीगाळही केली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार आणि इतर पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुरेश माने याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ढमढेरे करीत आहेत.
First published:

Tags: Sexual harrasment

पुढील बातम्या