मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune News: पुण्यात वाहनचालकाची मुजोरी, दंड भरण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून पळवली कार

Pune News: पुण्यात वाहनचालकाची मुजोरी, दंड भरण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून पळवली कार

दंड भरण्यास सांगितल्याने संतापला, पुण्यात वाहतूक पोलिसाला 700 मीटर फरपटत नेलं

दंड भरण्यास सांगितल्याने संतापला, पुण्यात वाहतूक पोलिसाला 700 मीटर फरपटत नेलं

Pune traffic Police drags by man on car bonnet: दंड भरण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला फरफटत नेल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.

पुणे, 17 ऑक्टोबर : वाहतूक पोलिसाला (Traffic Cop) 700 मीटर अंतरावर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune) घडला आहे. पूर्वीच्या थकलेले वाहतुक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. यानंतर संतापलेल्या एका कारचालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना 700 ते 800 मीटर फरफटत नेण्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी हडपसर येथे राहणाऱ्या प्रशांत श्रीधर कांतावर (वय 43) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (Police Constable Sheshrao Jaybhay) (वय 43) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड येथे घडली. शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय आणि त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम कारवाई करत होते. त्यावेळी प्रशांत कांतावर हा कार घेऊन चौकात आला. तेव्हा जायभाय यांनी गाडीवर पूर्वीचा 400 रुपयांचा दंड आहे तो भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवित दंडाची रक्कम न भरता त्यांनी जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातली. या घटनेत पोलीस कर्मचारी शेषराव जायभाय यांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी आरोपी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मुंबईत वाहतूक पोलिसासोबत घडला धक्कादायक प्रकार गेल्या महिन्यात मुंबईतही असाच काहीसा प्रकार घडला होता. मुंबईतील अंधेरी आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता, जेपी रोडवर एक वाहतूक पोलीस हवालदार आपल्या टीमसह कारवाई करीत होते. त्यावेळी हुंडाई क्रेटा कारला हात दाखवून रोखण्यासाठी सांगण्यात आलं, मात्र तो थांबण्याऐवजी पळ काढू लागला. ज्यानंतर वाहतूक पोलीस कारच्या बोनेटवर बसले आणि कार चालकाला बाहेर येण्यास सांगू लागले. तोपर्यंत मोठी गर्दी जमा झाली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलीस वारंवार कार चालकाला खाली उतरण्याची विनंती करीत होते. मात्र कार चालक खाली उतरण्याऐवजी बोनेटवर बसलेल्या वाहतूक पोलिसासह जलद गतीने कारला चालवत होता. काही वेळ गेल्यानंतर पोलीस कर्मचारी खाडी पडले. त्यानंतर संधी साधत गाडी चालकाने गाडी मागे फिरवली आणि तेथून फरार झाला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Pune, Pune police

पुढील बातम्या