रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे, 8 जुलै : कुठेही अपघात झाला की प्रत्येकाच्या ओठांवर पहिला शब्द रुग्णवाहिका असतो. कुठल्याही अपघातग्रस्त व्यक्तीला वैद्यकीय उपचार वेळेत मिळणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णवाहिकेची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, याच जीवदान देणाऱ्या रुग्णवाहिकेने बस स्थानकात उभ्या असलेल्या एका प्रवाशाला चिरडल्याचा प्रकार जुन्नर तालुक्यातील ओतुर बसस्थानकात घडला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काय आहे घटना? ओतूर बसस्थानकात हा प्रवासी उभा होता. यावेळी रुग्णवाहिका पार्किंगमधुन बाहेर पडत असताना प्रवाशाला अक्षरक्षः दोन वेळा चिरडलं आहे. अपघातानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी जखमी व्यक्तीला त्याच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यामध्ये या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Video : ओतूरमध्ये जीवदान देणाऱ्या रुग्णवाहिकेनेच प्रवाशाला चिरडले pic.twitter.com/ctzpEU6mWL
— News18Lokmat (@News18lokmat) July 8, 2023
ओतूर- ब्राम्हणवाडा रस्त्यावरील भीषण अपघात गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचं प्रमाण वाढल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच सम्रुद्धी महामार्गावर बसला झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर जुन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाचा जिल्हा मार्ग ओतूर- ब्राम्हणवाडा रस्त्यावर मागच्या महिन्यात ओतूरवरून ब्राम्हणवाडा गावच्या दिशेने जात असताना मोटरसायकल स्लीप होऊन कारवर जाऊन अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. वाचा - गांजा तस्कर कॉन्स्टेबलचा हात, पोलिसांनी सापळा लावून 6 जणांना ठोकल्या बेड्या यावेळी संजय रखमा भागरे (वय 24, रा. कबटवाडी साखीरवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) तर धनराज सुनील भागरे (वय 22, रा. कोहणे, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे. तर कृष्णा काशिनाथ गोडे (रा. केळी कोतूळ, ता. अकोले, जि. अहमदनगर) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर आळेफाटा येथे उपचार सुरू आहेत.

)







