पिंपरी-चिंचवड, 09 ऑक्टोबर : महानगरपालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्रातील टाकीमध्ये एका तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या आत्महत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रवी जानराव असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रवी जानराव यांनी जल शुद्धीकरण केंद्राच्या टाकीवर चढून थेट उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून रवी यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हे वाचा-धक्कादायक घटना! ते मूल माझं नाही, म्हणत पती घालायचा वाद, नंतर पत्नीनं केलं असं.
या घटनेनंतर स्थानिकांनी या जलशुद्धीकरण केंद्राकडे धाव घेत या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र रवी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पिंपरी शहरतील भटनागर लिंक रोडवर असलेल्या मैला शुद्धीकरण केंद्राची सुरक्षा महापालिका तर्फे केली जाते.
कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला जलशुद्धीकरण केंद्रात प्रवेश नसतो. मात्र मयत रवी वॉचमन म्हणून तिथे रात्रीच्या वेळी काम करायचा आणि तो काही कामासाठी आला असेल म्हणून त्याला प्रवेश दिल्या गेला आणि त्यानं असं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी दिली ,दरम्यान ह्या घटनेची नोंद करण्यात आली असून पिंपरी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.