मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे ग्रामीणच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तब्बल 3 लाख 6 हजार रुपये किमतीच्या 11 मोटार सायकली जप्त

पुणे ग्रामीणच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तब्बल 3 लाख 6 हजार रुपये किमतीच्या 11 मोटार सायकली जप्त

सराईत मोटार सायकल चोराकडून तब्बल 3 लाख 6 हजार रुपये किमतीच्या एकूण 11 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

सराईत मोटार सायकल चोराकडून तब्बल 3 लाख 6 हजार रुपये किमतीच्या एकूण 11 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

सराईत मोटार सायकल चोराकडून तब्बल 3 लाख 6 हजार रुपये किमतीच्या एकूण 11 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

पुणे, 20 डिसेंबर : पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कामगिरी करत सराईत मोटार सायकल चोराकडून तब्बल 3 लाख 6 हजार रुपये किमतीच्या एकूण 11 मोटार सायकली जप्त केल्या आहेत. तसंच त्याच्याकडून एकूण 5 गुन्हे उकडकीस आणले आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली 17 डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईतील मुख्य आरोपींचा व इतर सुत्रधार यांचा शोध घेत असताना स्था.गु.शा. पुणे ग्रामीण च्या खेड-जुन्नर पथकाला आज सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आशिष बेल्हेकर हा नारायणगाव एस. टी. स्टँड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्था.गु.शा. पुणे (ग्रा) टीमने नारायणगाव एस.टी स्टॅन्ड येथे मुख्य आरोपीस सापळा रचून ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आशिष सुनील बेल्हेकर वय 28 वर्ष. रा. नारायणगाव, ता. जुन्नर जि. पुणे असे सांगितले. त्यानंतर त्याची व त्यांच्याकडे असणाऱ्या मोटारसायकल बाबत चौकशी केली असता सदर मोटार सायकल ह्या त्याचा मित्र पवन दत्तात्रय शेजवळ वय 33 रा.नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे ह्याच्या मदतीने नारायणगाव व जुन्नर परीसरातून चोरुन आणलेल्या असल्याचे समजले. याबाबत संबधित पो.स्टे.कडे खात्री करता त्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे समजले तरी सदर संशयित इसमांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेल्या व विक्री करण्या करीता जवळ बाळगलेल्या एकूण 11 मोटार सायकली किंमत अंदाजे 3 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या मोटार सायकली काढून दिल्या. त्या सर्व मोटार सायकली जप्ती पंचनाम्याने जप्त करुन, आरोपी व जप्त मुद्देमाल नारायणगाव पोलीस स्टेशन यांचे ताब्यात पुढील कार्यवाही करीता दिलेल्या आहेत. दरम्यान, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या साथीदाराकडून यापूर्वी 13 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उप.विभा.पो.अधिकारी. मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune (City/Town/Village), Pune police

पुढील बातम्या