पुणे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, ट्रक, ब्लकर आणि कंटेनरची धडक

पुणे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, ट्रक, ब्लकर आणि कंटेनरची धडक

ट्रक दुभाजक ओलांडून पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकला.

  • Share this:

सुमित सोनवणे, (प्रतिनिधी)

पुणे,26 ऑक्टोबर:पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक, ब्लकर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. ट्रकचा चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर जवळील कदमवाक वस्तीजवळ शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास सिमेंटचा ट्रक, ब्लकर आणि कंटेनर या तीन जड वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातामुळे पहाटे 3.30 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

कदमवाक वस्तीजवळील काळे पेट्रोल पंपजवळ सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक पेट्रोल पंपावर डिझेल भरून रस्ता ओलांडत असताना पुण्याच्या दिशेने येणारा ब्लकर ट्रकला धडकला. ब्लकर सिमेंटच्या ट्रकला धडकल्यामुळे ट्रक दुभाजक ओलांडून पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकला. यामध्ये ट्रक आणि ब्लकर पलटी झाल्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. तातडीने पोलिस अपघाताच्या ठिकाणी पोहोचून दोन क्रेनच्या मदतीने ब्लकर आणि सिमेंट या दोन्ही वाहनांना बाजूला केली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ब्लकरचे आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले असून

ट्रकचा चालक जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ऐन दिवाळीच्या गर्दीमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक, ब्लकर आणि कंटेनरची विचित्र अपघात झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 01:36 PM IST

ताज्या बातम्या