Home /News /pune /

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

प्रातिनिधिक फोटो (PTI)

प्रातिनिधिक फोटो (PTI)

Major accident on Mumbai Pune highway: मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    पुणे, 30 जानेवारी : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात (major accident on old Mumbai Pune highway) झाला आहे. भरधाव कार आणि कंटेनरमध्ये धडक (Container and car collied)  झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू (5 people died) झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला हा अपघात झाला आहे. (Major accident on Old Mumbai Pune Highway, 5 people died on the spot) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजक ओलांडून थेट पलिकडच्या मार्गावर गेली. त्यानंतर समोरुन येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झालेली ही गाडी हरियाणा पासिंगची असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात गाडीतील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. लोणावळा क्रॉस केल्यानंतर शिलाटणे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. वाचा : पुणे हादरले !'तुला खल्लास करतो' म्हणत तरुणीच्या डोक्यात घातला हातोडा अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त गाडीतील नागरिकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या अपघातात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या भीषण अपघातामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आठवड्यापूर्वी पुणे-नगर महामार्गावर विचित्र अपघात 23 जानेवारी रोजी पुणे-नगर महामार्गावरील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील एक विचित्र अपघात झाला होता. भरधाव ट्रकने कार आणि दुचाकी गाड्यांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील 24 वा मैल येथे 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने फोर व्हीलर आणि दोन टू व्हीलर गाड्यांना जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Accident, Mumbai, Pune

    पुढील बातम्या