Home /News /pune /

Baramati Accident: बारामतीत भीषण अपघात; कार आणि ट्रॅक्टरची एकमेकांना धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Baramati Accident: बारामतीत भीषण अपघात; कार आणि ट्रॅक्टरची एकमेकांना धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

बारामतीत भीषण अपघात; कार आणि ट्रॅक्टरची एकमेकांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

बारामतीत भीषण अपघात; कार आणि ट्रॅक्टरची एकमेकांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Baramati accident news: बारामतीत कार आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक झाली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

बारामती, 19 जानेवारी : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात भीषण अपघात (Major accident in Baramati Taluka Pune District) झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला (3 people died on the spot) आहे. कार आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातता एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये दोन महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. बारामती तालुक्यातील मोरगावजवळ (Morgaon Baramati Taluka) रात्री उशीरा हा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोरगावनजिक भंडारी कुटुंबीय प्रवास करत असलेल्या कारची आणि एका ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक झाली. या भिषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सौ. अश्विनी श्रेणीक भंडारी, मिलिंद श्रेणीक भंडारी आणि सौ. कविता उदयकुमार शहा अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे आहेत. ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. भंडारी ज्वेलर्स श्रेनिक भंडारी यांच्या पत्नी अश्विनी भंडारी आणि मुलगा प्रथमेश भंडारी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. बारामतीतील या तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या बिंदीया सुनील भंडारी यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. वाचा : राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला; मात्र समोर आली ही दिलासादायक बाब सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर 16 जानेवारी रोजी सोलापुरात एक भीषण अपघात झाला होता. भरधाव स्कॉर्पिओने झाडाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर - विजयपूर महामार्गावर तेरामैल येथे हा भीषण अपघात झाला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेले तिघेही सोलापूर येथील निवासी आहेत. गाडी चालवताना वेगावर नियंत्रण असणं आवश्यक असतं. त्यासंदर्भात रस्त्यांच्या शेजारी अनेक ठिकाणी बोर्ड्सही लावण्यात आलेले असतात. मात्र, असे असतानाही अनेकदा प्रवासी आपल्या गाडीचा वेग अधिक ठेवतात आणि त्यामुळे अपघात होत असतात. आता सोलापूर येथून अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. भरधाव असलेल्या स्कॉर्पिओ गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला होता.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Accident, Pune

पुढील बातम्या