पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा गेम यशस्वी, भाजपला दाखवलं आस्मान

पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा गेम यशस्वी, भाजपला दाखवलं आस्मान

शिवसेनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला.

  • Share this:

सुमित सोनवणे (प्रतिनिधी),

हवेली, 5 नोव्हेंबर: स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पहिल्यांदाच महाविकासआघाडीचा (Mahavikas Aghadis game successful) प्रयोग पुणे जिल्ह्यातील (Pune District) यशस्वी झाल्याची पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडीनं भाजपला (BJP) दाखवलं आस्मान दाखवलं, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

हवेली पंचायत समितीच्या (Haveli Panchayat Samiti Election)  निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर विजयी ठरल्या आहेत.

हेही वाचा..इनकमिंग सुरूच! एकनाथ खडसेंसह 5 माजी आमदारांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा

हवेली पंचायत समितीच्या महात्मा गांधी हॉलमध्ये झालेल्या उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर यांनी भाजपचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्द यादव यांचा 16 विरुध्द 3 अशा मोठ्या फरकाने पराभाव केला.

हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीच्या वतीने हेमलता बडेकर यांनी तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनिरुद्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारीत वेळेत दोघांचे उमेदवारी अर्ज राहिल्यानं मोठी चुरशी निर्माण झाली होती. घेण्यात आलेल्या मतदानात हेमलता बडेकर यांना 16 तर अनिरुध्द यादव यांना केवळ 3 मते मिळाली.

निवडणुक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी हेमलता बडेकर यांची उपसभापती निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हेमलता बडेकर यांना पाठिंबा दिला, त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

या निर्णायावरून मंत्र्यांमध्ये मतभेद

दुसरीकडे, राज्यात कोरोनाची लाट (Coronavirus wave) त्यात आलेली दिवाळी (Diwali) आणि थंडीची लागलेली चाहूल यामुळे राज्यात फटाक्यांवर बंदी (Ban on Diwali Firecrackers) आणावी, अशी मागणी काही मंत्र्यांनी केली होती. मात्र यावरून मंत्र्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यात काही मंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालावी ही मागणी केली तर काहीनी त्यास हरकत घेत विरोध केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटाके बंदी करावी ही आग्रही भूमिका घेतली. त्याच्या भूमिकेस काहीजणांनी हरकत घेतली. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. फटाके व्यावसायिकांनी यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. अचानक असा निर्णय घेतला तर त्यांना फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली गेली. आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा फटाकेबंदी करावी या मताचे असल्याचे संकेत त्यांनीच दिले होते.

हेही वाचा...अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा..,फडणवीसांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

एकमत होत नसल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर नंतर चर्चा करू असं सांगत विषय थांबवला. आता मुख्यमंत्री संबंधित सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतली अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 5, 2020, 9:17 PM IST

ताज्या बातम्या