Home /News /pune /

पुणेकरांनो शेकोट्या पेटवा, थंडीचा कडाका वाढणार! महाराष्ट्र गारठणार

पुणेकरांनो शेकोट्या पेटवा, थंडीचा कडाका वाढणार! महाराष्ट्र गारठणार

राज्यात पुढील 2 दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. कुठल्या शहरात गारठा वाढणार पाहा सविस्तर Weather Updates

    पुणे, 19 डिसेंबर : येत्या २ दिवसांमध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे (Pune news ) आसपासच्या परिसरात तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD.in) वर्तवला आहे. राज्याच्या कुठल्या भागात पारा उतरणार (Maharashtra weather update) याची सविस्तर माहिती - उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठा वाढल्याने याचा राज्यातील हवामानावर परिणाम होणार आहे. मुंबईसोबतच पुण्यातही नागरिकांना पुढील दोन दिवसात कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. या कारणामुळे वाढणार थंडी - उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे.दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान , हरियाणा या भागात तापमानाचा पारा खाली आला आहे. यातच राज्यात सध्या हवामान कोरडे असून पुढील एक आठवडा ते कोरडेच राहाणार असल्याचे हवामान शास्त्र विभागाच्या संकेत स्थळावरुन स्पष्ट होते. याचाच परिणाम राज्यातील अनेक भागात झाला असून थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातील राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता बहुतेक ठिकाणी आकाश निरभ्र असून थंडीचा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी म्हणजेच २० डिसेंबरला पुण्यात किमान तापमान १३.३ अंश सेल्सियस तर कमाल तापमान २९ अं. से राहाणार असल्याचा अंदाज  हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, अतिवृष्टी, उकाडा याचा सामना करणाऱ्या पुणे आणि मुंबईकरांना आता कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Pune, Weather update

    पुढील बातम्या