सावधान! पुण्यात येत्या 72 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

सावधान! पुण्यात येत्या 72 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

कोल्हापूरसह चार जिल्ह्यात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

  • Share this:

पुणे, 10 ऑक्टोबर : पुढील 72 तासांत पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातील काही भागांत 72 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. हा पाऊस थोड्या वेळासाठी असेल पण मुसळधार असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी वर्तवली आहे. यानंतर 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कमी होईल. पण त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे, असंही कश्यपी यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच कोल्हापूरसह चार जिल्ह्यात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

(वाचा : पुण्याला पावसानं पुन्हा झोडपलं, PMPबसवर झाड कोसळून चालक जखमी)

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला 9 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये मान्सूननं देशासह मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रला चांगलंच झोडपून काढलं आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सूननं आपल्या परतीचा प्रवास सुरू झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली आहे.

Loading...

(वाचा :  पुण्याला धडकी! पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग; एका तासात रस्ते जलमय)

मुंबईत 11 ऑक्टोबरला ढगाळ वातावरण

11 ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुंबई 11 ऑक्टोबरला शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहील. तसंच हलक्या स्वरुपातील पाऊस पडेल.

(वाचा : दिवसा घामाच्या धारा; संध्याकाळी वादळी पावसाच्या... आणखी किती दिवस राहणार असं हवामान? )

दिवसा हवेत असलेल्या कमालीच्या आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहतात, तर संध्याकाळी आभाळ भरून येऊन वादळी पावसाच्या धारा भिजवतात, असं विचित्र हवामान राज्याच्या बहुतेक भागांत सध्या जाणवत आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे आणि या विचित्र हवेपासून किमान आठवडाभर सुटका नाही, अशी चिन्हं आहेत. येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या सरी अशाच बरसत राहण्याची शक्यता आहे. स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात 13 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 ऑक्टोबरपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यात वादळी वाऱ्यासह भयंकर पाऊस, झाडं कोसळली VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...