अहमदनगर, 27 एप्रिल: अहमदनगर (Ahmednagar)मधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला (Maharashtra Vakhar Mahamandal) भीषण (Major Fire) आग लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) येथील ही घटना आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थली अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. अचानक लागलेल्या या आगीने सर्व व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. गोडाऊन मधील कापूस आणी मक्याचे आगीत मोठे नुकसान झाले आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) April 27, 2021
वाचा: Positive Story: सकारात्मक विचार आणि पोटावर झोपणे या जोरावर 82 वर्षीय आजींची कोरोनावर मात
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाहीये. मात्र, गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला लागलेली ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेली नाहीये. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून स्थानिक नागरिकही या ठिकाणी प्रशासनाला आग विझवण्यासाठी आवश्यक ती मदत करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Fire