• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • Maharashtra unlock : मुंबईला एक आणि पुण्याला वेगळा न्याय का? पुण्याच्या महापौरांचा सरकारला सवाल

Maharashtra unlock : मुंबईला एक आणि पुण्याला वेगळा न्याय का? पुण्याच्या महापौरांचा सरकारला सवाल

महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे, असंही मोहोळ म्हणाले.

  • Share this:
पुणे, 02 ॲागस्ट : कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे २२ जिल्ह्यात अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. पण पुण्यात (pune corona cases) निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohal) यांनी नाराजी व्यक्त करत मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? असा सवाल विचारला आहे. तसंच, महापौर म्हणून व्यापाऱ्यांसोबत आहोत, असं म्हणत इशारा सुद्धा दिला आहे. राज्य सरकारकडून अनलॅाकबद्दल नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवले आहे. तर मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट दिली आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? असा सवाल मोहोळ यांनी उपस्थितीत केला. सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली असून या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे, असंही मोहोळ म्हणाले. दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे निर्बंध राज्य सरकारने जैसे थेच ठेवल्याबद्दल व्यापारी महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईला वेगळा न्याय आणि पुण्याशी दुजाभाव, असा निर्णय व्यापारी अजिबात मान्य करणार नाहीत म्हणूनच उद्या पुण्यातले सर्व व्यापारी आपआपल्या दुकानांसमोर घंटानाद आंदोलन करणार आहेत, असं पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी ही माहिती दिली. या ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील या जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये खालीलप्रमाणे सूट सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील. सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत. सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने  सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सुचना जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सुचना. सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सुट नाही. राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील. शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल. सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल. रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही. गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत   मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.
Published by:sachin Salve
First published: