पुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रावरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर

पुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रावरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर

कोथरुड मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराला मतदान केंद्रावर दिली ऑफर.

  • Share this:

वैभव सोनवणे,(प्रतिनिधी)

पुणे,21 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मतदान होत आहे. पुण्यामध्ये दुपारी 2 पर्यंत 26.59 टक्के मतदान झाले. पुण्यातील कोथरुड मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी थेट त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना बोलता बोलता भाजपची ऑफर दिली. चंद्रकांत पाटील यांनी जरी ऑफर दिली असली तरी सध्या या ऑफरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटलांनी दिलेली ही ऑफर मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी फेटाळून लावली आहे.

चंद्रकांत पाटील मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पुण्यातील कोथरुड मतदारसंघात आढावा घेण्यासाठी आले होते. त्याचवेळी मयुर कॉलनीतील जोग शाळेत मतदानासाठी आलेल्या मनसे उमेदवार किशोर शिंदे यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा रंगली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी किशोर शिंदे भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचे समजते. मात्र, मनसे उमेदवार किशोर शिंदे यांनी ही ऑफर फेटाळून लावली. भाजपमध्ये येण्याचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी यावेळी पाटलांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये कला क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत आणि युवकांपासून वयोवृद्धांपर्यंत लोकशाहीच्या उत्सवाचा आनंद सर्वांमध्येच ओसंडून वाहताना दिसला.

पिंपरीत झालं बोगस मतदान, पाच जण ताब्यात

मतदानाच्या काळात बोगस मतदान रोखण्यासाठी आयोग सर्व काळजी घेत असते. मतदान केंद्रावर हजर असलेले सर्व पक्षांचे प्रतिनिधीही मतदान चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी काळजी घेत असतात. असं असतानाही पिंपरीत बोगस मतदान झाल्याचं आढळून आलंय. पिंपरी गावातल्या विद्यानिकेतन शाळेतल्या बुथ क्रमांक 303 वर हे बोगस मतदान झालं. शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी याबाबतची तक्रार केलीय. त्यानंतर पोलिसांनी असं मतदान करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलंय. बोगस मतदान करणारे पाचही जण हे परप्रांतिय असून स्थानिक लोकांच्या नावावर ते मतदान करून गेले. आपण बोगस मतदान केल्याचं त्यांनीही कबूल केल्याची माहिती दिली जातेय. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून बोगस मतदान रोखण्याचं निर्धारही पोलिसांनी व्यक्त केलाय. सोलापूर आणि विदर्भातही निवडणुकीच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडल्याने गालबोट लागलंय.

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या