• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पगारवाढीची घोषणा केली, पण तरीही कर्मचाऱ्यांचा एल्गार सरुच, विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका

पगारवाढीची घोषणा केली, पण तरीही कर्मचाऱ्यांचा एल्गार सरुच, विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका

राज्य सरकारच्या पगारवाढीच्या घोषनेनंरही एसटी कर्मचारी मागे हटण्याच्या भूमिकेत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव जरी मान्य झाला असला तरी विलीनीकरण हीच प्रमुख मागणी आहे, अशी भूमिका पुण्यातील शिवाजीनगर डेपोतील एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तिढा सोडण्यासाठी राज्य सरकार एक पाऊल पुढे आलं आहे. परिवन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांची विविध कॅटेगिरीनुसार अडीच हजार ते पाच हजार पगारवाढीची घोषणा केली. पण राज्य सरकारच्या या घोषनेनंरही एसटी कर्मचारी मागे हटण्याच्या भूमिकेत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव जरी मान्य झाला असला तरी विलीनीकरण हीच प्रमुख मागणी आहे. केवळ पगारवाढीच्या मुद्द्यावर कामबंद आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका पुण्यातील शिवाजीनगर डेपोतील एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. राज्य सरकारने पगारवाढीची जी घोषणा केली ती खरंतर 2012 सालीच होणे अपेक्षित होतं. विलीनीकरणाची घोषणा झाली नाही तर कामबंद आंदोलन सुरुच ठेवणार, अशी घोषणा कर्मचाऱ्यांनी केली.

  सोलापूर आगारातील कर्मचाऱ्यांकडून केळं दखवत निर्णयाचा निषेध

  राज्य सरकारच्या पगारवाढीवर एसटी कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नाही. सोलापूर आगाराच्या कर्मचाऱ्यांनी केळं दाखवत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. "एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सोलापुरातूनच सुरुवात झाली होती. अनिल परब यांनी जे जाहीर केलं आहे ते आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना मान्य नाही. आमचा मुळ मुद्दा हा विलीनीकरण हा आहे. विलीनीकरणाचा मुद्दा सोडून ते दुसऱ्याच मुद्दावर बोलत आहेत. आम्ही पगारवाढीचं फक्त बोलत नाही आहोत. आम्ही विलनीकरणही मागत आहोत. पण हा विलीनीकरणाचा मुद्दा सोडून आमचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सोलापूर आगाराचे कर्मचारी हे सरकारला केळं दाखवून सरकारच्या निर्णयाचा निषेध करत आहोत", अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली.

  अनिल परबांकडून पगारवाढीची घोषणा

  दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषध घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. त्यांनी पहिल्या फळीतील 1 ते 10 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात 5 हजार रुपयांच्या पगारवाढीची घोषणा केली. तसेच 10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात 4 हजारांची वाढ केली. तसेच 20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय दर महिन्याला 10 तारखेच्या आत पगार होईल, याची काळजी घेतली जाईल, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा : अनिल परब यांची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात थेट 5 हजारांनी वाढ

  अनिल परब नेमकं काय म्हणाले?

  "जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांमध्ये पगाराबाबत नाराजी होती. त्यांचा आक्रोश गेल्या काही दिवसांमध्ये दिसला. त्यामुळे त्यांच्या पगारात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास 41 टक्के ही पगारवाढ करण्यात आली आहे", अशी घोषणा अनिल परब यांनी केली. "10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात आम्ही 4 हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे ज्यांचं मुळ वेतन 16 हजार होतं. त्यांचा पगार मुळ वेतनाच्या 23 हजार 40 रुपये आहे. आता वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार 800 इतका झाला आहे", अशी माहिती त्यांनी दिली. "20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. ज्याचं स्थूल वेतन 37 हजार 440 होतं त्याचं वेतन आता 41 हजार 40 झालेलं आहे. ज्याचं स्थूलवेतन 53 हजार 280 होतं त्याचं वेतन 56 हजार 880 होईल", असंदेखील अनिल परबांनी सांगितलं.
  Published by:Chetan Patil
  First published: