मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

SSC Result: 10वी परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपद्धतीचे वेळापत्रक जाहीर, पाहा कसा होणार निकाल जाहीर

SSC Result: 10वी परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपद्धतीचे वेळापत्रक जाहीर, पाहा कसा होणार निकाल जाहीर

Maharashtra SSC Result: इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे होणार या संदर्भातील निकष ठरवण्यात आले आहेत.

Maharashtra SSC Result: इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे होणार या संदर्भातील निकष ठरवण्यात आले आहेत.

Maharashtra SSC Result: इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे होणार या संदर्भातील निकष ठरवण्यात आले आहेत.

पुणे, 9 जून : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द (Maharashtra SSC board exams) करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा रद्द केल्यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार? हा प्रश्न सर्वांच्या मानत होता. या संदर्भात परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत गुरुवारी (10 जून 2021 रोजी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) पत्रक जाहीर करत म्हटलं, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) परीक्षा कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली आहे. तसेच 28 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर (schedule of evaluation procedure of 10th exam result) करण्यात आली आहे.

त्यानुसार, आता शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना आणि वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. 10 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता शिक्षक आणि मुख्याध्यापकांना या कार्यपद्धतीच्या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

वैद्यकीय परीक्षा 10 जूनपासून; कोविडमुळे अनुपस्थित राहिल्यास काय? वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिलं उत्तर

सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. तसेच शासन निर्णयानुसार 10वीच्या मूल्यमापन कार्यपद्धतीच्या संदर्भात प्रशिक्षणाचा व्हिडीओ शिक्षण मंडळाच्या यू-ट्यूब चॅनलवर http://mh-ssc.ac.in/faq या लिंकवर 10 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कार्यवाहीचे वेळापत्रक 

मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत मंडळाच्या यू-ट्यूब चॅनलवर प्रशिक्षण - 10 जून 2021 (सकाळी 11 ते दुपारी 1)

अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे - 11 जून 2021 ते 20 जून 2021

विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे - 11 जून 2021 ते 20 जून 2021

वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून निकाल शाळेच्या निकाल समितीकडे सादर करणे - 11 जून 2021 ते 20 जून 2021

वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षण व नियमन करून प्रमाणित करणे - 12 जून 2021 ते 24 जून 2021

मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीत भरणे - 21 जून 2021 ते 30 जून 2021

मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे सिलबंद पाकीटात विभागीय मंडळात जमा करणे. (विभागीय मंडळाच्या नियोजनानुसार) - 25 जून 2021 ते 30 जून 2021

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) परीक्षा निकालाबाबत विभागीय मंडळ व राज्यमंडळ स्तरावरील प्रक्रिया - 3 जुलै 2021 पासून

First published:

Tags: Exam, Ssc board