मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Rain Alert: काळजी घ्या; पुढील 3 तासांत पुण्यासह 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

Rain Alert: काळजी घ्या; पुढील 3 तासांत पुण्यासह 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain forecast: राज्यातील विविध भागांत पुढील 3 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Rain forecast: राज्यातील विविध भागांत पुढील 3 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Rain forecast: राज्यातील विविध भागांत पुढील 3 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे, 7 जुलै : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा जोरदार आगमन (Heavy rain in Maharashtra) केल्याचं दिसत आहे. विदर्भातील (Vidarbha) काही भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच आता पुढील तीन तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD predict thunderstorm with lightning and rain) वर्तवला आहे.

आयएमडीचे के. एस. होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, पुढील तीन तासांत रायगड जिल्ह्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किमी इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.

होसळीकर यांनी आणखी एक ट्विट करत म्हटलं, विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पुणे, जळगाव, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातही पुढील तीन तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पुढील तीन तासांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी तसेच मोठ्या झाडांखाली आसरा घेऊन थांबू नये असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.

यवतमाळमध्ये 27 बकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील खातेरा येथे विज पडून झाडाखाली उभ्या असलेल्या 27 बकऱ्यांचा जागेवर मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. खातेरा परिसरात आभाळ दाटून आले असता दरम्यान वीजांचा कडकडाटसह जोरदार पाऊस पडला. याच दरम्यान जंगलात चरण्यासाठी गेलेल्या बकऱ्या झाडाखाली उभ्या असतांना या झाडावर वीज कोसळली. दुर्दैवाने यामध्ये 27 बकऱ्यांचा मृत्यू झाला.

चंद्रपुरातही वीज कोसळून 25 जनावरांचा मृत्यू

वीज पडून 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अमलनाला येथे ही घटना घडली आहे. अमलनाला धरणाच्या सांडव्या जवळ ही गुरे चरत होती. अचानक आलेल्या पावसात वीज पडून 25 गाई-बैलांचा मृत्यू झाला आहे. सर्व जनावरे अमलनाला परिसरातील माणोली या गावातील होती.

First published: