MPSC: राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर, विद्यार्थ्यांनो तयार राहा!

MPSC: राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर, विद्यार्थ्यांनो तयार राहा!

अजुनही वाहतूक सेवा सुरळीत झालेली नाही. रेल्वे सेवाही बंद आहेेत. त्यामुळे परीक्षेसाठी पोहोचायचं कसं? असा विद्यार्थ्यांना प्रश्न आहे.

  • Share this:

पुणे 12 ऑगस्ट: राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर आयोगाने जाहीर केली आहे. 13 सप्टेंबर2020 रोजी निश्चित केलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 20 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.एमपीएससीकडून(Maharashtra public  service commission) सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. कोरोनाच्या साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नंतर 13 सप्टेंबर ही तारीख दिली होती मात्र त्याच दिवशी देशव्यापी NEETची परीक्षा होणार असल्याने आयोगाने ही नवी तारीख जाहीर केली आहे.

मात्र अजुनही अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे की अजून परीक्षा पुढे गेली पाहिजे, अजून खूप विद्यार्थी आपल्या आपल्या मूळ गावी आहेत, वाहतुक सेवा सुद्धा चालू नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुण्यात आणि इतर शहरांमध्ये येणं शक्य नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.

एप्रिलमध्ये पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा ही 13 सप्टेंबरला होणार होती. मात्र त्याच दिवशी देशव्यापी NEETची परीक्षा होणार असल्याने तारीख बदलावी लागली असं आयोगाने म्हटलेलं आहे.

कोरनाची स्थिती पाहता सर्व काळजी घेण्यात येत असल्याचंही आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलेलं  आहे.

GOOD NEWS! 2 आठवड्यांत मिळणार कोरोना लस; रशियाने सुरू केलं उत्पादन

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात एका दिवसात 60 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहे. गेल्या 24 तासातही 60 हजार 963 रुग्ण सापडले. तर, आतापर्यंत 704 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख 29 हजार 639 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख पार झाली आहे. यात 6 लाख 43 हजार 948 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 46 हजार 91 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 39 हजार 599 रुग्ण निरोगीही झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 70% झाला आहे.

घाबरू नका, कोरोनाला हरवणं शक्य; भारतातल्या 70% रुग्णांनी करून दाखवलं

राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. एका दिवसात तब्बल अकरा हजार 88 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 256 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्युदर 3.42 टक्के इतका आहे. राज्यात आज 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजपर्यंत तीन लाख 68 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 68.79 टक्के एवढं झालं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 12, 2020, 5:34 PM IST
Tags: mpsc exam

ताज्या बातम्या