जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / मोठी बातमी! आढळराव पाटील शरद पवारांच्या संपर्कात? राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याच्या दाव्यानं खळबळ!

मोठी बातमी! आढळराव पाटील शरद पवारांच्या संपर्कात? राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याच्या दाव्यानं खळबळ!

शिवाजीराव आढळराव पाटील

शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 7 मार्च : शिरूर लोकसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर येत आहे. शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. मात्र आढळराव पाटील जरी दार ठोठावत असले तरी त्या दाराच्या किल्ल्या आपल्याकडे असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले कोल्हे?  अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिरूरचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला. मात्र आढळराव पाटील जरी दार ठोठावत असले तरी त्या दाराच्या किल्ल्या आपल्याकडे असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कोल्हेंचा निशाणा एका मुलाखतीमध्ये बोलताना खासदार आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर खरमरीत टीका केली होती , त्यांच्या टीकेला उत्तर देताना कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मी माझे छंद चार चौघात उजळ माथ्याने सांगू शकतो, तुमचे छंद तसे आहेत का ?असा सवाल करत कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, पाण्यात म्हैस अन् बाजारात मोर अशी परिस्थिती आहे. आढळराव पाटील बोलतात एक अन् करतात दुसरंच. ते आता पवारांच्या संपर्कात आहेत असा दावा कोल्हे यांनी केला  आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात