चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 4 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-भाजपशी हातमिळवली केली आहे. विश्वासू लोकांनीच दगा दिल्याने शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. पण पुण्यात भाजपची पुरती गोची होणार आहे. कारण अजित पवारांनी पालकमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. सध्या पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. भाजप काय मांडवली करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पुण्यात भाजपची गोची गेली वर्षभर अजित पवारांच्या बंडाबाबतच्या बातम्या तशा अधूनमधून येतच होत्या. त्याला अखेर गेल्या रविवारी मूर्त स्वरूप आलं. अजित पवार 30-40 आमदारांसह थेट सत्तेत डेरेदाखल झाल्याने पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची कशी जिरवली, अशा आनंदात केंद्रातील भाजप नेते असतीलही पण पुणे भाजप मात्र पुरती गपगार झाली आहे. कारण अजित पवार फक्त उपमुख्यमंञी घेऊन गप्प बसणाऱ्यातले नाही तर ते पुणे पाललकमंत्री पदावरही ताबा मारणार हे सर्वांनाच ठाऊक आहे. किंबहुना भाजपसोबत जाताना बोलीच तशी झालेली आहे. म्हणूनच पालकमंत्री पदाच्या संभाव्य बदलाबाबत पुणे भाजपचा एकही नेता ऑन कॅमेरा बोलायला तयार नाही. अगदी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीदेखील याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलंय. अजित पवार गटाला सोबत घेतल्याने एकटे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच विस्थापित होणार नाहीत तर ही यादी खूप लांबलचक असेल. पण तुर्तास आपण पुणे जिल्ह्यापुरतंच बोलुयात. वाचा - खातेपाटप कसं होणार? खुद्द अजित पवार यांनीच सांगितली आतली बातमी आता याचं काय होणार? चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्रीपद जाणार? विजय बापू शिवतारे, पुरंदर, शपथविधीला दादांसमोर लोटांगण? अजितदादांना कंटाळून हर्षवर्धन पाटील भाजपात गेले पण तिथेही आता तेच वाट्याला येणार. खेडमध्ये आढळराव पाटीलही नाराज? पुणे मनपातही अजित पवार गटाला सत्तेत वाटा द्यावा लागणार? भाजपातील संभाव्य विस्थापितांची ही यादी आणखीनही लांबू शकते.
पुणे जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला असल्याने भाजपचे बहुतांश स्थानिक पदाधिकारी हे अजित पवारांची दादागिरी सहन करतच राजकारणात कसबसे पुढे आलेत. पण आता केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या सोईसाठी पुन्हा तेच दंबग अजित पवार स्थानिकांच्या माथी मारल्याने पुणे भाजपवाल्यांची पुरती कोंडी झाल्याचं बघायला मिळतंय. पण वरिष्ठांच्या विरोधात बोलायचीही सोय नाही. पुणे भाजपवाल्यांना आणखी काय काय पाहावं लागतंय तो येणारा काळच ठरवेल.

)







