पुण्याची भीती वाढली! नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण सापडले

पुण्याची भीती वाढली! नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण सापडले

यूकेत (UK) आढळलेल्या नव्या स्ट्रेनच्या (corona new strain) कोरोना रुग्णांची संख्या आता पुण्यात वाढू लागली आहे.

  • Share this:

पुणे, 07 जानेवारी : महाराष्ट्रात आता नवा कोरोनाही (Maharashtra coronavirus) हातपाय पसरताना दिसतो आहे. नव्या कोरोनाच्या (corona news strain) रुग्णांची संख्या आता आणखी वाढली आहे. मुंबईपाठोपाठ (mumbai) आता पुण्याचाही (pune) धोका वाढला आहे. पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेल्या कोरोना रुग्णांची पुण्यातील संख्या आता 4 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील नव्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. आज पुण्यात तीन रुग्ण आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. याआधी राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाल्याचे 8 रुग्ण सापडले होते. त्यात मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील गुरुवारची आकडेवारी पाहता एकूण 19,58,282 कोरोना रुग्ण आहेत. 18,56,109 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.78%  आहे. मृत रुग्णांची संख्या 49897 झाली आहे. मृत्यू दर 2.55% आहे. दिवसभरात 3,729 नवे रुग्ण आढळले आहेत तर 3,350  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता एकूण 51,111 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचा - 'कोरोनाबाबत आता हलगर्जीपणा नको कठोर राहा', मोदी सरकारचे उद्धव ठाकरेंना आदेश

देशात नव्या कोरोनाचे एकूण 73 रुग्ण झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.  देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी तब्बल  59% प्रकरणं फक्त या चार राज्यांमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांचा समावेश आहे. या राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र दिलं आहे.

हे वाचा - सरकारने केलं अलर्ट! बनावट Co-WIN अ‍ॅपपासून राहा सावधान, अन्यथा होईल मोठं नुकसान

कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत आपण जे प्रयत्न केलं आणि त्यातून जे काही आपण साध्य केलं, मिळवलं ते राज्यांनी दिलेली कोणतीही शिथीलता, सूट किंवा राज्यांचा हलगर्जीपणा यामुळे पाण्यात जाऊ शकतं. त्यामुळे सध्या कोरोना प्रकरणांचा उद्रेक पाहता कठोर राहण्याच्या आणि आवश्यक ती पावलं उचलण्याचे आदेश केंद्रीय सचिवांनी या राज्यांना दिले आहेत.

Published by: Priya Lad
First published: January 7, 2021, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading