मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

रिपोर्ट न बघताच सही करून जिवाशी खेळणाऱ्या पुण्यातल्या महिला डॉक्टरचा पर्दाफाश; MMC ने केली कारवाई

रिपोर्ट न बघताच सही करून जिवाशी खेळणाऱ्या पुण्यातल्या महिला डॉक्टरचा पर्दाफाश; MMC ने केली कारवाई

रिपोर्टवर फक्त सही देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळ करणं पुण्यातील (Pune) महिला डॉक्टरला चांगलंच महागात पडलं आहे.

रिपोर्टवर फक्त सही देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळ करणं पुण्यातील (Pune) महिला डॉक्टरला चांगलंच महागात पडलं आहे.

रिपोर्टवर फक्त सही देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळ करणं पुण्यातील (Pune) महिला डॉक्टरला चांगलंच महागात पडलं आहे.

  • Published by:  Priya Lad
पुणे, 07 डिसेंबर : आरोग्याची कोणतीही समस्या उद्भवली की डॉक्टर चाचणी करण्याचा सल्ला देतात आणि या चाचणीवरूनच रुग्णाच्या आजाराचं निदान होतं आणि त्यानुसार डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात. मात्र हा रिपोर्टच चुकीचा असेल तर रुग्णावर चुकीचे उपचार होतील आणि त्यामुळे रुग्णाच्या जीवालाही धोका उद्भवू शकतो. त्यामुळे चाचणीचा हा रिपोर्ट आणि त्यावरील डॉक्टरांची सही खूप महत्त्वाची असते. ही सही म्हणजे चाचणीचा रिपोर्ट योग्य असल्याचा पुरावा असतो. मात्र डॉक्टरांनी रिपोर्ट न पाहताच ही सही देणं म्हणजे रुग्णांच्या जीवाशी अप्रत्यक्षपणे खेळच आहे आणि रुग्णांच्या जीवाशी असाच खेळ करणाऱ्या पुण्यातील (Pune) महिला डॉक्टरला चांगलंच महागात पडलं आहे. महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलनं (Maharashtra Medical Council) पुण्यातील एमडी डॉ. श्रीशा मोहन यांचं लायसन रद्द केलं आहे.  पुणे जिल्ह्यातील अनेक पॅथ लॅबमध्ये त्या उपस्थित नसताना चाचणी रिपोर्टवर त्यांच्या स्वाक्षरी आहेत. त्यांनी आपल्या इलेक्ट्रॉनिक साइन दिलेल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टने (Maharashtra Association of Practicing Pathologists and Microbiologists - MAPPM) डॉ. मोहन यांच्याविरोधात एमएमसीकडे तक्रार केली होती. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार MMC ने 2 डिसेंबरला नोटीस जारी केली. त्यानुसार डॉ. श्रीशा यांच्या एकाच दिवसात पुण्यातील विविध ठिकाणच्या पॅथ लॅबमधील रिपोर्टवर स्वाक्षरी आहे, प्रत्यक्षात त्या तिथं नव्हत्यात. लोहगाव, चाकण, दिघी, आळंदी, खेड, राजगुरूनगर आणि पुणे जिल्ह्यात इतर ठिकाणी असलेल्या लॅबचा यात समावेश आहे.  MMC ने जारी केलेल्या आदेशानुसार 30 एप्रिल, 2019 पासून या प्रकरणआचा तपास सुरू झाला. 23 ऑक्टोबर 2020 ला या प्रकरणाची ऑनलाइन सुनावणी होती, मात्र त्यावेळी डॉ. श्रीशा हजर राहिल्या नाहीत. गेल्या वर्षभरात या आरोपांबाबत काही स्पष्टीकरणही दिलेलं नाही. हे वाचा - "WHO नं सांगितलं कोरोना लशीत विष मिसळा", राष्ट्राध्यक्षांचा खळबळजनक दावा MMC चे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितलं, "मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या (Medical Council of India - MCI) नियमांनुसार जो पॅथॉलॉजिस्ट स्वतः लॅबमध्ये हजर नाही तो रिपोर्टवर स्वाक्षरी करू शकत नाही. फक्त टेक्निशियननं रिपोर्ट दिला म्हणून नाही तर पॅथॉलॉजिस्टनं तो रिपोर्ट योग्य आहे की नाही याची खात्री स्वतः करायला हवी.  या रिपोर्टच्या आधारेच रुग्णावरील पुढील उपचार ठरतात. रिपोर्ट चुकीचा असेल तर रुग्णावर चुकीचे उपचार होतील आणि ते त्याच्यासाठी जीवघेणेही ठरू शकतात. अनेक नोटिशींनंतरही डॉ. श्रीशा यांनी प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे आम्ही आता कारवाई केली आहे" दरम्यान डॉ. मोहन यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्या म्हणाल्या, "मी 1990 पासून प्रॅक्टिस करत आहे. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपात काहीही तथ्यं नाहीत ते चुकीचे आहेत. माझ्याविरोधात षडयंत्र रचला जात आहे. माझं लायसन्स परमंट आहे. MMC च्या वेबसाईटवर या प्रकरणात कोणतीही नोटीस नाही आणि माझं नावही अद्याप वेबसाईटवर आहे" हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर आता अज्ञात आजाराचं संकट; झपाट्यानं वाढत आहेत रुग्ण MAPPM चे डॉ. प्रसाद कुकर्णी यांनी सांगितलं, "स्थानिक आरोग्य विभागानं स्थानिक पॅथॉलॉजी लॅब किती कायदेशीर आहेत याची पडताळणी करावी. असे बरेच डॉक्टर आहेत, त्यामुळे लोकांनीदेखील जागरूक राहावं. आपली चाचणी करण्यापूर्वी पॅथलॅबबाबत माहिती घ्यावी"
First published:

Tags: Woman doctor

पुढील बातम्या