Home /News /pune /

आरोग्य विभाग भरती पेपर फुटीचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; पुणे पोलिसांनी असा लावला छडा, वाचा Exclusive रिपोर्ट

आरोग्य विभाग भरती पेपर फुटीचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; पुणे पोलिसांनी असा लावला छडा, वाचा Exclusive रिपोर्ट

आरोग्य विभाग भरती पेपर फुटीचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत, पुणे पोलिसांनी असा लावला छडा, वाचा Exclusive रिपोर्ट

आरोग्य विभाग भरती पेपर फुटीचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत, पुणे पोलिसांनी असा लावला छडा, वाचा Exclusive रिपोर्ट

Maharashtra Health department recruitment paper leak case: सायबर पोलिसांनी परीक्षार्थींच्या तक्रारीवरून हा पेपर नेमका कुठून आणि कसा व्हायरल झाला याचा तपास सुरू केला असता त्याची त्याची लिंक ही थेट आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात जाऊन पोहोचली. आता आपण हा पेपर नेमका कसा फुटला? तेही सविस्तरपणे समजाऊन घेऊयात.

पुढे वाचा ...
पुणे, 8 डिसेंबर : आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणाचा (Maharashtra Health Department Recruitment paper leak case) छडा लावण्यात पुणे सायबर पोलिसांना (Pune cyber police) यश आलंय. लातूर येथील आरोग्य संचालनायती मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनीच हा पेपर फोडल्याचे पोलीस तपासात समोर उघड झालंय. प्रशांत बडगिरे याने त्याच्याच विभागातील डॉ. संदीप जोगदंड यांचेकडून 10 लाख आणि शाम म्हस्के यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन हा पेपर फोडला होता. पुणे पोलिसांची सायबर शाखा या प्रकरणाचा तपास करत असून प्रशांत बडगिरेसह 11 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलीय. (News18 Exclusive report on Maharashtra Health Department Recruitment paper leak case) गेल्या 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या ड वर्ग पदासाठीचा पेपर फुटल्याचा आरोप झाल्यानंतर त्यावेळी खरंतर आरोगमंञी राजेश टोपे आणि आरोग्य विभागाच्या संचालक अर्चना पाटील मँडम यांनी असं काही झालंच नसल्याचा दावा केला होता. पण न्यूज 18 लोकमतने हे प्रकरण सातत्याने लावून धरताच अखेर महिन्याभराने आरोग्य विभागानेच पुणे सायबर पोलिसात यासंबंधीचा रितसर गुन्हा दाखल केला. पण त्या आधीच सायबर पोलिसांनी परीक्षार्थींच्या तक्रारीवरून हा पेपर नेमका कुठून आणि कसा व्हायरल झाला याचा तपास सुरू केला असता त्याची त्याची लिंक ही थेट आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात जाऊन पोहोचली. आता आपण हा पेपर नेमका कसा फुटला? तेही सविस्तरपणे समजाऊन घेऊयात. विजय मुराडे (जि. जालना)या आरोपीच्या मोबाइलवरून पेपर व्हायरल झाला मुराडे याला हा पेपर बुलढाण्याच्या बबन मुंडेनं पाठवला होता तर मुंडे याने हा पेपर सुरेश जगताप या क्लास चालकाकडून घेतल्याचं निष्पन्न अधिक तपास करता ही पेपर फुटीची लिंक उद्धव नागरगोरे या शिक्षकामार्फत थेट आरोग्य विभागात जाऊन पोहोचली वाचा : 15 लाखांसाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानेच फोडला आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर बीडचे मनोरूग्ण विभागाचे डॉक्टर संदिप जोगदंड आणि उस्मानाबादचा आरोग्य कर्मचारी राजेंद्र सानप यांनी लातूरच्या आरोग्य उपसंचालनालयातील CEO प्रशांत बडगिरे यांना 15 लाख रुपये देऊन हा पेपर खरेदी केल्याचं उघड झालंय पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच न्यूज18 लोकमतला ही माहिती दिलीय. या आरोग्य परीक्षा पेपर फुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर खरंतर पुणे पोलीस गुन्हा दाखल करण्यास सारखी टाळाटाळ करत होते. फक्त चौकशी सुरू आहे, एवढीच माहिती दिली जायची. पण परीक्षार्थींनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सातत्याने हा मुद्दा लावून धरल्याने हा सगळा घोटाळा उघडकीस आलाय. पुणे सायबर पोलीस आता या आरोपी सीईओला हा पेपर नेमका कुठून मिळाला याचा तपास करत आहेत. त्यामुळे या आरोग्य विभाग भर्ती घोटाळ्याची लिंक थेट मंत्रालयापर्यंत जाते का हेच पाहायचंय. तसं असेल तर या घोटाळ्यातले मोठे मासेही पुणे पोलिसांच्या गळाला लागणार का? की निसटणार हे तपासाअंतीच निष्पन्न होणार आहे. ठाण्यातूनही बड्या अधिकाऱ्याला घेतलं ताब्यात आरोग्य विभागाच्या या भरती घोटाळ्यात पुणे पोलिसांनी ठाण्यातून एका बड्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. हा अधिकारी आरोग्य विभागाचा जॉईंट डायरेक्टर आहे. महेश बोटले या अधिकाऱ्याची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Job, Maharashtra, Pune

पुढील बातम्या