पुणे, 11 ऑगस्ट : पूरग्रस्तांच्या मदतीकरता मराठी चित्रपट कलाकार पुढे सरसावले आहेत. पुणे, मुंबई आणि ठाण्यात 8 मदत केंद्र सुरू करून अन्न पदार्थ ,कपडे,औषधं अशा वस्तूंचा ओघ सुरू झाला आहे. मदत गोळा करण्याचा उपक्रम 14 तारखेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर पूरग्रस्तांपर्यंत ही मदत पोहचवण्यात येईल. पुण्यात सुबोध भावे, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे यांनी रविवारी हजर राहून या मदतकार्याचा आढावा घेतला. त्यांच्याशी बातचित केली आहे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी.