मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

राष्ट्रीय खेळाडूला भररस्त्यात मारहाण, पुण्यातील संतापजनक प्रकार

राष्ट्रीय खेळाडूला भररस्त्यात मारहाण, पुण्यातील संतापजनक प्रकार

टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना सध्या सर्व देश पाठिंबा देत आहे. त्याचवेळी राष्ट्रीय खेळाडूला भर रस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना पुण्यात उघड झाली आहे.

पुणे, 5 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना सध्या सर्व देश पाठिंबा देत आहे. त्याचवेळी राष्ट्रीय खेळाडूला भर रस्त्यात मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  पुण्यातील फातिमानगर भागातील ही संतापजनक घटना आहे.

काय आहे प्रकरण?

सुमीत टिळेकर (Sumit Tilekar) असं या प्रकरणातील आरोपीचे आहे. फातिमा नगर भागातील सिग्नलवर गाडी पुढे नेण्याच्या वादावरुन टिळेकर आणि महाराष्ट्राची ज्यूडो रेसलिंग खेळाडू वैभवी गणेश ठुबे यांच्यात वाद झाला. या वादानंतर टिळेकर त्यांच्या BMW गाडीतून उतरला आणि त्याने वैभवीला जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये तिच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झालं आहे.

पुणेकरांचा मनपावर संताप; क्रीडांगणावरील 2 कोटींच्या रामाच्या शिल्पामुळे नवा वाद

पोलिसांची हाराकिरी

या प्रकरणात टिळेकरने जबर मारहाण केल्यानंतरही वानवडी पोलिसांनी सुरुवातीला किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे टिळेकरची तात्काळ जामीनावर सुटका झाली. आरोपीची सुटका केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील भर रस्त्यात महिलेला झालेली ही मारहाण अतिशय गंभीर आहे.  या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मनसेनं केली आहे.

First published:

Tags: Crime news, Pune (City/Town/Village)