युतीत कितीही गोडवा असला तरी शिवसेनेची ही खदखद कधीच मिटणार नाही!

युतीत कितीही गोडवा असला तरी शिवसेनेची ही खदखद कधीच मिटणार नाही!

गुरुवारी पुण्यात भाजपच्या कार्यालयात मित्रपक्षांसोबत समन्वय बैठक होती. त्या बैठकीत शिवसेनेचा अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 11 ऑक्टोबर : जागावाटपाचा फॉर्म्युला जुळत नसल्यामुळे युती तुटण्याच्या चर्चा असताना मोठी तडजोड करत अखेर युती झाली. युतीच्या अंतिम फॉर्म्युल्यात भाजप- 144, शिवसेना- 126, तर मित्रपक्ष- 18 अशी जागावाटप झाली. पण युतीत कितीही गोडवा असला तरी शिवसेनेची एक खदखद कधीच मिटणार नाही. गुरुवारी पुण्यात भाजपच्या कार्यालयात मित्रपक्षांसोबत समन्वय बैठक होती. त्या बैठकीत शिवसेनेचा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिवसेनेला पुण्यात एकही जागा दिलेली नाही त्यामुळं खदखद आहे.

पुणे शिवसेना संपर्कप्रमुख बाळा कदम यांचे पीए अतुल राजूरकर यांना सेना युवा कार्यकर्ता किरण साळी यांनी मारहाण केली. तिकीट देतो म्हणून पैसे घेता असा आरोप लावत मारहाण करण्यात आली. त्यामुळे कुठेतरी सेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यावेळी गिरीश बापट, माधुरी मिसाळदेखील हजर होत्या. अखेर त्यांनी मध्यस्थी करत समजूत घालत सर्वांना शांत केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

खरंतर पुण्यात भाजपने सेनेला एकही जागा न सोडल्याने पक्ष पदाधिकारी सेना भवनाला अक्षरशः कुलूप घालून मातोश्रीवर जाऊन बसले होते. त्यात दुसरीकडे भाजपमध्ये चंद्रकांतदादांपाठोपाठ शिरोळे यांच्या घराणेशाहीलाही विरोध सुरू झाला होता. पुण्यात भाजपने शिवसेनेला एकही जागा न सोडल्याने सेना भवनाला हे असं भलं मोठं टाळं लावण्यात आलं होतं. नाराज पक्ष कार्यकर्ते 'मातोश्री'वर जाऊन बसले होते.

शिवाजीनगरमधून उत्सुक असलेले माजी पोलीस भानू प्रताप बर्गे यांनी तर थेट अपक्षच लढण्याची घोषणा करून टाकली होती. शिवतारे मात्र, या पुणे शहर सेनेच्या या खच्चीकरणाबद्दल सरळ कानावर हात ठेवत आहेत. 2009 साली पुण्यात कोथरूड आणि हडपसरमध्ये सेनेचे आमदार होते. त्यामुळे दोन मतदारसंघातून युतीबाबत तीव्र नाराजी आहे.

इतर बातम्या - निवडणुकीला 10 दिवस असताना काँग्रेसला मोठा धक्का, या दिग्गजांनी धरला भाजपचा हात!

भाजप-शिवसेनेच्या 50 जागा धोक्यात, विधानसभेचं गणित बदलणार?

भाजप आणि शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणूक सोपी असल्याचं मानलं जात असतानाच युतीला धक्का बसला आहे. कारण जवळपास 50 मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी वाढवली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातीलही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलं आहे. त्यामुळे बंडखोर नेते भाजप-शिवसेनेचं गणित बिघडवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

इतर बातम्या - आज महाराष्ट्रात राजकीय सभांचा धडाका, पाहा तुमच्या शहरात आहे कोणाची सभा?

'होय, आमच्या बाबत घेवाण कमी आणि देवाणच जास्त झाली'

दरम्यान, जागावाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये भाजप मोठा भाऊ तर शिवसेना छोटा भाऊ ठरली आहे. हे खुद्द शिवसेनेनं मान्य केलं आहे. जागावाटपात सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या असून या देवाण घेवाणीत... शिवसेनेला यावेळी देवाणच जास्त झाली आहे असं सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलं होतं. दरम्यान, घेवाणीत जे मिळालं आहे तिथे शंभर टक्के यश मिळवणारच असा निर्धारही व्यक्तं करण्यात आलां होता. तसंच राज्यात विरोधकांची अवस्था फाटकी-तुटकी अशी झाल्याची टिकाही सामनातून करण्यात आली होती.

इतर बातम्या - चिमुकलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत पार्कमध्ये सापडली

First published: October 11, 2019, 8:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading