छगन भुजबळ राष्ट्रवादीत राहणार की जाणार... वाचा, काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

छगन भुजबळ राष्ट्रवादीत राहणार की जाणार... वाचा, काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • Share this:

पुणे, 5 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतच राहणार, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. पुणे महानगरपालिकेत एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छगन भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेवर पत्रकारांकडून विचारलेल्या प्रश्नावर सुप्रीया सुळे यांनी आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील पंधरा वर्षात संघर्षच केला आहे. या निवडणुकीत संघर्ष करून पुन्हा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी त्यांनी व्यक्त केला.

..हे बाहेरच्या व्यक्तीने सांगण्याची गरज नाही..

सुप्रिया सुळे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. शरद पवार यांनी मागील 50 वर्षांत राज्यासाठी काय केले, अमित शाह महाराष्ट्रात आल्यावर शरद पवार यांच्यावर टीका केली होती. बाहेरच्या व्यक्तीने येऊन शरद पवारांनी काय केले सांगण्याची गरज नाही. राज्यातील जनतेला माहिती आहे की, शरद पवार काय आहेत, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. |

दगाबाजीचे, धोकेबाजीचे पुरावे द्या, सुप्रिया सुळेंचे हर्षवर्धन पाटलांना थेट आव्हान

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी इंदापूरमध्ये मेळावा घेऊन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादी धोकेबाज, दगाबाज, विश्वासघातकी आहे असा घणाघाती आरोप करत पवार कुटुंबीयांवर त्यांनी सगळा राग काढला होता. हा राग काढत असतानाच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचेही संकेत दिले होते. हर्षवर्धन पाटील यांचे हे आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलेच लागले आहेत. आज पुण्यात त्यांनी पाटील यांना या दगाबाजीचे पुरावे सादर करण्याचं थेट आव्हानच दिले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात कौटुंबीक संबंध आहेत. त्यांचे कालचं भाषण ऐकल्यानंतर दुःख झालं. त्यानंतर मी त्यांना अनेकवेळा फोन केला पण त्यांचा फोन लागला नाही. दगाबाजीच्या आरोपाचे त्यांनी पुरावे दिले पाहिजेत. जे पक्ष सोडून जाताहेत ते मुलांच्या भवितव्यासाठी विचारांची फरफट करताहेत. मला कौतुक वाटतय की पवारांना फक्त मुलगीच आहे. आता फक्त मुलांचा प्रवेश होतो वडिलांना नकार मिळतो असंही त्या म्हणाल्यात.

छगन भुजबळ यांच्या शिवसेने प्रवेशाच्या चर्चेवरही त्यांनी मत व्यक्त केलं. भुजबळांवर माझा विश्वास, कुणी काहीही म्हणेल, ते काही म्हणत नाहीत तोवर मी कशावरही विश्वास ठेवणार नाही. पवारांवर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रात कुणीही मोठ होऊ शकत नाही हा 50 वर्षांचा इतिहास आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

काय म्हणाले होते हर्षवर्धन पाटील?

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरातल्या मेळाव्यात एकदाचे आपल्या मनात वर्षानुवर्षे साचलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यांनी त्यांचा भाजपकडे जायचा कल आहे हे सूचकपणे सांगितले आणि जनसंकल्प मेळाव्याला उपस्थित इंदापूरकरांनीही भाजप, भाजप, कमळ, कमळ म्हणत तोच कौल दिला.

SPECIAL REPORT : युतीत जागावाटपात भाजप ठरतोय मोठा भाऊ, सेनेला मान्य?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 08:04 PM IST

ताज्या बातम्या