तुम्हाला हिशेब द्यावा लागेल.. मुख्यमंत्र्यांनी मतदारांना दिला दम वजा इशारा

तुम्हाला हिशेब द्यावा लागेल.. मुख्यमंत्र्यांनी मतदारांना दिला दम वजा इशारा

तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत आणि इकडे शरद पवारांची अवस्था तर 'शोले' सिनेमातील 'जेलर'साखी अर्थात 'आधे इधर जावं आधे उधर जावं बाकी मेरे साथ आव', अशी झाली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड,10 ऑक्टोबर:विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रचाराला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रसवर बोचरी टीका केली आहे. निवडणुका कुणासोबत लढायच्या खरंच कळत नाही आहे. आमचे पैलवान तयार आहेत पण पुढे कुणीच नाही. तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत आणि इकडे शरद पवारांची अवस्था तर 'शोले' सिनेमातील 'जेलर'साखी अर्थात 'आधे इधर जावं आधे उधर जावं बाकी मेरे साथ आव', अशी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामागे कुणीही नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

गुंतवणुकीबाबत 5 व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. देशातील 25 टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत. 35 लाख रोजगार महाराष्ट्रात तयार झाले असून महाराष्ट्र रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. कुणाला शंका असेल तर केंद्र सरकारची वेबसाईट बघा, असा अजब दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मतदारांनी दिला दम वजा इशारा...

'मी उमेदवार निवडून द्या म्हणून सांगायला आलो नाही. उमेदवार तर निवडून येणारच आहेत. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही रेकॉर्ड करणार आहात काय. 24 तारखेला पुन्हा मी येईन आणि तुम्ही रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून दिले नाही तर तुम्हाला त्याचा हिशेब द्यावा लागेल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी चिंचवडमधील मतदारांना दम वजा इशारा दिली. रेकॉर्ड ब्रेक मतांनीच महायुतीचा उमेदवार निवडून द्याल, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सुशीलकुमार शिंदे द्रष्टे नेते, निवडणुकीनंतर काय होणार हे त्यांन समजंलय...

सुशीलकुमार शिंदे हे द्रष्टे नेते आहेत. त्यांना निवडणुकीनंतर काय होणार आहे ते समजले आहे. म्हणूनच सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते, आता आम्ही फार थकलो आहोत, आमच्याने आता काहीही होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण आपण करु. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी होणार की विरोधी पक्ष नेताही त्यांना निवडता येणार नाही. कारण विरोधी पक्ष नेता निवडायचा असेल तर 10 टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळवाव्या लागतात. पण तेवढ्याही जागा मिळणार नाही ही खात्री पटल्यानेच सुशीलकुमार शिंदे विलिनीकरणाची भाषा करत आहेत असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

VIDEO:उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, औरंगाबादेत सुखरूप लँडिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 09:30 PM IST

ताज्या बातम्या