गिरीश बापटांवर पंच.. रामदास आठवले म्हणाले, ते ब्राह्मण असले तरी...

गिरीश बापटांवर पंच.. रामदास आठवले म्हणाले, ते ब्राह्मण असले तरी...

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करून चालत नाही. त्यांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत

  • Share this:

पुणे,16 ऑक्टोबर: भाजप-शिवसेना महायुतीने आम्हाला केवळ 5 जागा सोडल्या, आम्ही नाराज असलो तरी त्याचा उपयोग नाही. 5 जागांवर निवडणूक आयोगाची पक्षाला मान्यता मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे आम्ही भाजपचे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. कमळावर उमेदवार निवडून आला तरी तो रिपइंचा आमदार राहणार आहे. त्यांचा गट वेगळा असेल, असे रिपइंचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले. परंतु प्रत्येकवेळी आम्ही कमळावर लढणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रामदास आठवले पत्रकारांशी संवाद साधत होते. गिरीश बापट हे ब्राह्मण असले तरी ते आम्हाला आमचेच वाटतात, असा पंचही आठवलेंनी यावर केला. कँटोमेंटची जागा मिळावी, अशी आमची अपेक्षा होती. पुण्यात एसआरएचे नियम बदलावेत. जे शहर राहिले नाही जुने, त्याचे नाव आहे पुणे.., अशी चारोळी आठवलेंनी पत्रकारांना ऐकवली.

उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे 'वारसदार'

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करून चालत नाही. त्यांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत, असे सांगत रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तुमची लायकी काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. अगोदर शिवसेना आणि आता भाजपाच्या सावलीत डोळे मिटून मंत्री बनण्याची स्वप्ने बघणारे तुम्ही., असा टोलाही आठवले यांनी यावेळी लगावला. वंचित व दलितांचं राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवरही त्यांनी नाव न घेता टीका केली. 'वंचित बहुजन आघाडी काढून रिपब्लिकन पक्षाचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही आठवलेंनी केला. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने भाजपकडे 8 जागांची मागणी केली होती, पण 5 जागा मिळाल्या. त्यामुळे केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. राज्यातही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद हवे, विधान परिषदेत दोन आमदार आणि चार महामंडळांवर प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे रामदास आठवलेंनी यावेळी सांगितले.

VIDEO : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात स्मृती इराणींची मराठीतून तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2019 02:59 PM IST

ताज्या बातम्या